महाराष्ट्र

maharashtra

Chandrapur Crime : धक्कादायक! दुर्गापुरात खुनाचा थरार; आरोपींनी शीर धडावेगळे करून केला फुटबॉलसारखा वापर

By

Published : Nov 8, 2022, 9:34 AM IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीचा दुर्गापुरात (Durgapur Crime) अतिशय निर्घृणपणे खून (Murder News) करण्यात आला. क्रूरतेचा कळस आणि थरारक बाब म्हणजे आरोपींनी त्याचे शीर धडावेगळे केले आणि त्याचा फुटबॉलसारखा वापर करत खेळ करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

murder in Durgapur
दुर्गापुरात खुनाचा थरार

चंद्रपूर:गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीचा दुर्गापुरात (Durgapur Crime) अतिशय निर्घृणपणे खून (Murder News) करण्यात आला. क्रूरतेचा कळस आणि थरारक बाब म्हणजे आरोपींनी त्याचे शीर धडावेगळे केले आणि त्याचा फुटबॉलसारखा वापर करत खेळ करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. महेश मेश्राम (वय 35) (Mahesh Meshram) असे मृतकाचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे होते. नुकताच तो कारागृहातुन सुटून बाहेर आला होता. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

थरारक घटना: महेश मेश्राम याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. दुर्गापुरात त्याची दहशत होती. एकदा तर त्याने दुर्गापुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षण स्वप्नील धुळे यांच्याही अंगावर धावून गेला होता. नुकताच तो कारागृहातुन सुटून आला होता. काल रात्री साडे दहाच्या सुमारास तो दुर्गापुरातील एका बारमध्ये बसला होता. यावेळी त्याच्याशी आरोपींचे भांडण झाले होते. आरोपींनी त्याला बाजूच्या पेट्रोल पंप परिसरात नेले. 10 ते 15 जणांनी त्याला बेदम मारहाण केली. दगडाने त्याला मारहाण करण्यात आली. आरोपी एवढयावरच थांबले नाही तर धारधार शस्त्रांनी त्याचे शीर कापून धडावेगळे करण्यात आले. जवळपास 50 मीटर आरोपीचे मुंडके नेण्यात आले. यादरम्यान या मुंडक्यासोबत आरोपी फुटबॉलसारखे खेळत असल्याचे काहींनी बघितले. इतकी थरारक ही घटना होती. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली असण्याची दाट शक्यता आहे.

आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे: घटना ज्या ठिकाणी घडली त्याच रस्त्यावर काही अंतरावर पोलीस ठाणे आहे, मात्र पोलीस योग्यवेळी पोहचलेच नाहीत. ज्यावेळी पोलीस पोहचले त्यावेळी आरोपी पसार झाले होते. यामुळे पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत येथे चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या घटनेसंबंधित दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्याशी संपर्क केला असता दोन आरोपींना पकडण्यात आले असून अन्य आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. जोवर तपास पूर्ण होत नाही तोवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात त्यांनी नकार दिला. या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details