महाराष्ट्र

maharashtra

Leopard Killed Boy in Chandrapur : कामगाराच्या मृत्यूनंतर 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेले; सलग दुसरी घटना

By

Published : Feb 18, 2022, 2:11 AM IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात एका कामगाराला वाघाने उचलून नेल्याच्या घटना नुकतीच घडली होती. त्यातच आता याच परिसरालगत एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना ( Leopard Killed Boy in Chandrapur ) घडली आहे. दुर्गापूर नेरी परिसरातील हा मुलगा असून त्याचे नाव राज भडके असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.

Chandrapur
Leopard

चंद्रपूर - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात एका कामगाराला वाघाने उचलून नेल्याच्या घटना नुकतीच घडली होती. त्यातच आता याच परिसरालगत एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली ( Leopard Killed Boy in Chandrapur ) आहे. दुर्गापूर नेरी परिसरातील हा मुलगा असून त्याचे नाव राज भडके असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे.

नुकतीच घडली आहे एक घटना -

बुधवारी रात्री चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी पद्धतीने काम करणारा कामगार घरी परतत असताना वाघाने त्याच्यावर हल्ला करीत उचलून नेले होते. आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला होता. ही घटना ताजी असतानाच याच वनपरिक्षेत्रात येणाऱ्या दुर्गापूर परिसरात एका 16 वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे.

अधिकारी म्हणाले...

दुर्गापूर ग्रामपंचायत मागील भागातून बिबट्याने उचलून नेल्याची माहिती आहे. यासंदर्भात शोधकार्य सुरू असून अजूनपर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याशी संपर्क केला असता त्यांना अशी कुठली माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर चंद्रपूर-दुर्गापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर यांच्याशी संपर्क केला असता घटनेचा तपास सुरू आहे. काही ठोस माहिती मिळाल्यानंतरच यावर भाष्य करता येणार असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

हेही वाचा -Chandrapur : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी बेपत्ता, वाघाने पळवल्याची भीती

ABOUT THE AUTHOR

...view details