महाराष्ट्र

maharashtra

Sextortion With Medical Officer: वैद्यकीय विभागाच्या बड्या अधिकाऱ्याचा 'हनी ट्रॅप'; 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

By

Published : Nov 30, 2022, 9:10 PM IST

वैद्यकीय विभागातील एक उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा हनी ट्रॅप (Honey Trap of Senior Medical Officer) करण्यात आला. सात वर्षांपूर्वी याच आंबटशौकापायी या अधिकाऱ्याला (Sextortion With Medical Officer) निलंबित व्हावे लागले. सातत्याने इंटरनेटची बिल भरमसाठ येत असल्याने वैद्यकीय विभागाने चौकशी नेमली होती. त्याची अश्लील चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल (Blackmail by making obscene tapes) करण्यात आले. तब्बल 50 लाखांची खंडणी (extortion of 50 lakhs) मागण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली तर अन्य तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Sextortion With Medical Officer
बड्या अधिकाऱ्याचा 'हनी ट्रॅप'

चंद्रपूर : वैद्यकीय विभागातील एक उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा (Sextortion With Medical Officer) हनी ट्रॅप (Honey Trap of Senior Medical Officer) करण्यात आला. त्याची अश्लील चित्रफीत तयार करून ब्लॅकमेल (Blackmail by making obscene tapes) करण्यात आले. तब्बल 50 लाखांची खंडणी (extortion of 50 lakhs) मागण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली तर अन्य तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्याच्या आधीच्या सवयी बघता हा अधिकारी अगदी अलगदपणे जाळ्यात अडकला. यापूर्वी याच अधिकाऱ्याला कार्यालयात अश्लील व्हिडीओ बघताना आढळल्याने निलंबित करण्यात आले होते हे विशेष. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. झिबल भारसाखरे, सादिक पठाण असे या आरोपींचे नावे आहेत तर अन्य तीन महिलांचा यात समावेश आहे. latest news from Chandraur, Chandrapur crime


अशी घडली घटना :चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील आरोपी झिबल भारसाखरे याचा वैद्यकीय विभागातील बड्या अधिकाऱ्याशी चांगला परिचय होता. पन्नाशी पार केलेला हा अधिकारी आंबट शौकीन असल्याचे त्याला चांगल्याने माहिती होते. त्यामुळे हा अधिकारी सहज जाळ्यात येऊ शकतो आणि ब्लॅकमेल करून त्याच्याकडून मोठी खंडणी मागू शकतो हे त्याला ठाऊक होते. सहा महिन्यांपूर्वी आरोपी झिबल भारसाखरे याने या अधिकाऱ्याला ओळखीची असलेल्या महिलेच्या घरी बोलावले. या महिलेने या अधिकाऱ्याला सांगितले की, एक महिलेला आपण खूप आवडता आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. त्यामुळे हा अधिकारी आणखी आतुर झाला. या महिलेला बोलाविण्यात आले. यानंतर अधिकाऱ्याला आपण खासगी चर्चा करण्यासाठी आतल्या खोलीत जावा असे सांगितले. आता सर्व प्रकार रेकॉर्ड करणारे कॅमेरे आधीच लागले होते, मात्र कामातुर झालेल्या बड्या अधिकाऱ्याला याचा जराही मागमूस लागला नाही.

शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेने मागितली खंडणी :यानंतर त्यांच्यात जे काही झाले ते सर्व रेकॉर्ड करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलेने थेट या अधिकाऱ्याला फोन करत काल जे आपल्यात झाले ते त्याची सर्व चित्रफीत आणि फोटो आपल्याकडे असल्याचे सांगत आठ लाखांची खंडणी मागितली. यानंतर घाबरलेल्या बड्या अधिकाऱ्याने आरोपी झिबल भारसाखरे याला फोन करत आपल्याला महिला ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगितले. आधीच सापळा रचण्यात आलेल्या या जाळ्यात डॉक्टर अलगत फसला होता. झिबलने आपण मध्यस्थी करतो असे सांगत तीन लाखांत हा सौदा केला. सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलीट केले असे सांगण्यात आले, अधिकारी निश्चिंत झाला. मात्र, 24 नोव्हेंबरला एका अनोळखी नंबरवरून या अधिकाऱ्याला कॉल आला. आपल्याकडे तुमची अश्लिल चित्रफीत आणि फोटो असून ते आपण व्हायरल करणार आहो, जर करायचे नसेल तर 50 लाख द्या अशी मागणी त्याने केली. यानंतर हतबल झालेल्या या अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून सादिक खान या आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. अन्य तीन महिला देखील यात सामील आहेत. त्यांच्या विरोधात भादवी कलम 384, 385 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, मंगेश भोयर, संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे आदिंनी केली.


आंबट शौकापायी या आधी झाला अधिकारी निलंबित :सात वर्षांपूर्वी याच आंबटशौकापायी या अधिकाऱ्याला निलंबित व्हावे लागले. सातत्याने इंटरनेटची बिल भरमसाठ येत असल्याने वैद्यकीय विभागाने चौकशी नेमली होती. यात हाच अधिकारी आपल्या कम्प्युटरमधून 'पॉर्न साईट' बघत असल्याचे समोर आले. त्यामुळे या अधिकाऱ्याला घरी बसावे लागले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details