महाराष्ट्र

maharashtra

चोरी केलेल्या वाळूचा शासकीय कामांसाठी वापर, प्रशासन कारवाईच्या तयारीत

By

Published : Jun 4, 2019, 4:04 PM IST

Updated : Jun 4, 2019, 5:30 PM IST

घुग्घुस परिसरातील बंद पडलेल्या वेकोली परिसरात वर्धा नदीचा चक्क प्रवाहच अडविला असल्याची बाब ईटीव्हीने सर्वप्रथम समोर आणली होती. यामध्ये प्रशासनाकडून काही वाहनांना पकडण्यात येत आहे. मात्र, ज्या प्रमाणात हा अवैध व्यवसाय सुरू आहे त्यामानाने प्रशासकीय यंत्रणांचे प्रयत्न कमी पडत आहेत. मागील आठवड्यात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत 10 ट्रॅक्टर आणि 3 हायवा पकडण्यात आले होते,  मात्र प्रत्यक्षात वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे.

चोरी केलेल्या वाळूचा शासकीय कामांसाठी वापर, प्रशासन कारवाईच्या तयारीत

चंद्रपूर - शहरातील घुग्घुस परिसरात चक्क वर्धा नदीचा प्रवाह अडवून वाळूमाफिया मोठया प्रमाणात वाळूची तस्करी करीत असल्याचे समोर आले होते. या वाळूचा वापर आता चक्क शासकीय बांधकामाकरता होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशी करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. यावरून वाळूमाफियांची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत, हे या प्रकारातून दिसून येत आहे.

चोरी केलेल्या वाळूचा शासकीय कामांसाठी वापर, प्रशासन कारवाईच्या तयारीत

वाळूच्या घाटांचा लिलाव बंद असल्याने बांधकामासाठी वाळूला काळाबाजारात प्रचंड मागणी आली आहे. त्यामुळे वाळूमाफियांचे एक मोठे रॅकेटच यात सक्रिय झाले आहे. त्यांनी थेट नदीच्या पात्रातच घाला घालायला सुरुवात केली. यामुळे मोकळ्या झालेल्या नदीच्या पात्रात उतरून अहोरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. येथील झुडुपी जंगलाचा फायदा घेऊन हजारो ब्रास वाळूची साठवणूक केली जाते. दिवसभरात काढण्यात येणारा वाळूचा साठा इतका प्रचंड आहे की त्याची किंमत ही कोट्यवधीच्या घरात आहे.

घुग्घुस परिसरातील बंद पडलेल्या वेकोली परिसरात वर्धा नदीचा चक्क प्रवाहच अडविला असल्याची बाब ईटीव्हीने सर्वप्रथम समोर आणली होती. यामध्ये प्रशासनाकडून काही वाहनांना पकडण्यात येत आहे. मात्र, ज्या प्रमाणात हा अवैध व्यवसाय सुरू आहे त्यामानाने प्रशासकीय यंत्रणांचे प्रयत्न कमी पडत आहेत. मागील आठवड्यात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत 10 ट्रॅक्टर आणि 3 हायवा पकडण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे.

घुग्घुस रेल्वे सायडिंगजवळ 1600 मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी हायवाने भरून हीच चोरीची वाळू उपयोगात आणली जात आहे. तसेच घुग्घुस बसस्थानकाच्या बांधकामामध्येही याचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे. महसूल विभागाच्या निदर्शनास ही बाब आली असून आता हा विभाग कारवाईच्या तयारीत आहे. संबंधित कामाची चौकशी करून यात काही गैर आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिल्या आहेत.

Intro:(ह्या बातमीचा दुसरा विडिओ mh_chd_illegal_sand_use_02 नावाने पाठवीत आहे.) चंद्रपूर : घुग्घुस परिसरात चक्क वर्धा नदीचा प्रवाह अडवून वाळूमाफिया मोठया प्रमाणात वाळूची तस्करी करीत असल्याचे समोर आले होते. या वाळूचा वापर शासकीय बांधकामाकरिता होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तवाळूमाफीयांची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत हे याप्रकारातून दिसून येत आहे. प्रशासनाकडून याप्रकरणी चौकशी करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.


Body:वाळूच्या घाटांचा लिलाव बंद असल्याने बांधकामासाठी वाळूला काळाबाजारात प्रचंड मागणी आले. त्यामुळे वाळूमाफियाचे एक मोठे रॅकेटच यात सक्रिय झाले आहे. त्यांनी थेट नदीच्या पात्रातच घाला घालायला सुरुवात केली. घुग्घुस परिसरातील बंद पडलेल्या वेकोली परिसरात वर्धा नदीचा चक्क प्रवाहच अडविला असल्याची बाब ईटीव्हीने सर्वप्रथम समोर आली. यामुळे मोकळया झालेल्या नदीच्या पात्रात उतरून अहोरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. येथील झुडुपी जंगलाचा फायदा घेऊन हजारो ब्रास वाळूची साठवणूक केली जाते. दिवसभरात काढण्यात येणारा वाळूचा साठा इतका प्रचंड आहे की त्याची किंमत ही कोट्यावधीच्या घरात आहे. प्रशासनाकडून काही वाहनांना पकडण्यात येत आहे. मात्र, ज्या प्रमाणात हा अवैध व्यवसाय सुरू आहे त्यामानाने प्रशासकीय यंत्रणा आणि प्रयत्न तोकडे पडत आहेत. मागील आठवड्यात महसूल विभागाने केलेल्या कारवाईत 10 ट्रॅक्टर आणि 3 हायवा पकडण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे. आता ही चोरीची वाळू शासकीय कामासाठी वापरण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घुग्घुस रेल्वे सायडिंगजवळ 1600 मीटर रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी हायवाने भरून चोरीची वाळू उपयोगात आणली जात आहे. तसेच घुग्घुस बसस्थानकाच्या बांधकामामध्येही याचा वापर होत असल्याची माहिती आहे. हा सर्व प्रकार अत्यंत गंभीर आहे. महसूल विभागाच्या निदर्शनास ही बाब आली असून आता हा विभाग कारवाईच्या तयारीत आहे. संबंधित कामाची चौकशी करून यात काही गैर आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिल्या आहेत.


Conclusion:
Last Updated : Jun 4, 2019, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details