महाराष्ट्र

maharashtra

Ganpati Coins in Mughal Empire : मुघल साम्राज्यातील गणपतीचे दुर्मिळ 'नाणे' बघितले का? फारसी भाषेत विघ्नहर्त्याचा उल्लेख

By

Published : Sep 3, 2022, 12:33 PM IST

ganpati coins
दुर्मिळ नाणे ()

मुघल साम्राज्याच्या काळात चक्क गणपतीचे नाणे काढण्यात Existence of Ganapati Coin in Mughal Empire आले. विशेष म्हणजे या नाण्यावर देवनागरी आणि फारसी भाषेचा अजोड संगम असून त्यात विघ्नहर्त्याचे नाव कोरण्यात Ganapati name on Coin in Persian language आले. 18 व्या शतकात सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानात हे नाणे तयार करण्यात आले असून हे दुर्मिळ नाणे सध्या चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांच्या संग्रहालयात जमा झाले Ganapati Coins found in Chandrapur आहे. मुघल साम्राज्याखाली राज्य करणारे मराठा शासनाच्या मिरजचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्याद्वारे हे नाणे तयार करण्यात आले आहे.

चंद्रपूर - मुघल साम्राज्याच्या काळात चक्क गणपतीचे नाणे काढण्यात Existence of Ganapati Coin in Mughal Empire आले. विशेष म्हणजे या नाण्यावर देवनागरी आणि फारसी भाषेचा अजोड संगम असून त्यात विघ्नहर्त्याचे नाव कोरण्यात Ganapati name on Coin in Persian language आले. 18 व्या शतकात सांगली जिल्ह्यातील मिरज संस्थानात हे नाणे तयार करण्यात आले असून हे दुर्मिळ नाणे सध्या चंद्रपुरातील इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर यांच्या संग्रहालयात जमा झाले Ganapati Coins found in Chandrapur आहे. मुघल साम्राज्याखाली राज्य करणारे मराठा शासनाच्या मिरजचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्याद्वारे हे नाणे तयार करण्यात आले आहे.

फारसी भाषेत विघ्नहर्त्याचा उल्लेख

हा आहे नाण्याचा इतिहास -18 व्या शतकात मुघल बादशाह शाह आलम द्वितीय (कार्यकाळ 1759 ते 1806) यांचे साम्राज्य Ganapati Coins in Mughal Empire होते. त्यांच्या अधिपत्यात मराठा शासक मिरज हे संस्थान होते. येथील संस्थानिक चिंतामण पटवर्धन यांच्या घराण्याचे आराध्यदैवत हे गणपती होते. त्यामुळे पटवर्धन यांच्या पुढाकारातुन या नाण्याची टाकसाळ तयार करण्यात आली.

नाण्याची खासियत -या नाण्यावर देवनागरी आणि फारसी या दोन्ही भाषेचा वापर करण्यात आला आहे. देवनागरी लिपीत गणपती तर फारसी भाषेत शाह आलम बादशाह गाझी आणि हिजरी वर्ष 1202 अंकित केले आहे. नाण्याच्या पृष्ठभागी देवनागरी लिपीत पंतप्रधान तर फारसी भाषेत मैमनत मानुस आणि टाकसाळेचे नाव मुर्तुजाबाद (मिरज) अंकित आहे. या चांदीच्या नाण्याचे वजन 11.34 ग्राम आहे. पंतप्रधान हे पेशव्यांच्या काळात पदवी होती. पेशव्यांप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी पटवर्धन यांनी हा मजकूर प्रसिद्ध केला. त्याकाळी कुठल्याही संस्थानिकांचे राजाचे शासन असले तरी नाणी मात्र दिल्लीत विराजमान असलेल्या बादशाहच्या नावावर बनवावे लागत होते. हे नाणे देखील त्यास अपवाद नाही.

हेही वाचा -CM Eknath Shinde letter To Governor : महाविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या 'त्या' १२ आमदारांचा पत्ता कट; मुख्यमंत्री राज्यपालांना देणार नवीन यादी

ABOUT THE AUTHOR

...view details