महाराष्ट्र

maharashtra

म्युकरमायकोसिसबाबत त्वरीत निदान करा : प्राजक्त तनपुरे

By

Published : Jun 4, 2021, 4:18 AM IST

म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली आहेत. यापैकी 26 जण बरे झाले आहेत.

मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

चंद्रपूर -कोविड नंतर होणारा म्युकरमायकोसीस या आजाराचे रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही आतापर्यंत 81 नागरिकांमध्ये या आजारची लक्षणे आढळून आली आहेत. यापैकी 26 जण बरे झाले आहेत. कोविडमधून बरे झालेले किंवा मधूमेह असलेल्या नागरिकांच्या संपर्कात राहून आरोग्य यंत्रणेने या आजाराचे त्वरीत निदान करावे, अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले. उर्जानगर येथील हिराई विश्रामगृहात कोविड संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त अशोक गराटे, तहसीलदार सचिन खंडाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे आदी उपस्थित होते.

'ॲम्पोटेरेसीन बी' या इंजेक्शनची उपलब्धता लवकरच'

म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी आवश्यक असलेले 'ॲम्पोटेरेसीन बी' या इंजेक्शनची उपलब्धता लवकरच सुरळीत होईल, असे सांगून राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांनाच म्युकरमायकोसीसच्या लक्षणांकडेही लक्ष द्या. तसेच अनियंत्रीत मधूमेह असणाऱ्या रुग्णांची माहिती घ्या. यावेळी राज्यमंत्र्यांनी मनपाच्या नवीन रुग्णालयाची परिस्थिती, जिल्ह्यातील ॲक्टीव्ह रुग्ण, महानगर पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या, सीसीसी, डीसीएच, डीसीएचसी, आयसीयु व रेमडेसीवीर इंजेक्शनची उपलब्धता आदींचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details