महाराष्ट्र

maharashtra

Chandrapur Double Murder Case : 'त्या' दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी अखेर चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Jan 29, 2022, 7:42 PM IST

दुहेरी हत्याकांडात आजन्म ( Chadrapur Double Murder Accused Arrest ) कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले जावई-सासरे मागील नऊ वर्षांपासून फरार होते. तेलंगाणा ते राहत होते. अखेर या आरोपींना पकडण्यात चंद्रपूर पोलिसांना ( Chandrapur Police ) यश आले.

Chandrapur
Chandrapur

चंद्रपूर - दुहेरी हत्याकांडात आजन्म ( Chadrapur Double Murder Accused Arrest ) कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेले जावई-सासरे मागील नऊ वर्षांपासून फरार होते. तेलंगाणा ते राहत होते. अखेर या आरोपींना पकडण्यात चंद्रपूर पोलिसांना ( Chandrapur Police ) यश आले. नागो रूषी रेडलावार (रा. बापट नगर, चंद्रपूर) आणि सुनील रमेश साखरकर (रा. मोरवा), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पगाराचे पैसे मागितले म्हणून पती-पत्नीची हत्या -

घुग्घूस पोलीस ठाणे हद्दीतील ताडाळी टी पाईंट येथे नागो रूषी रेडलावार (रा. बापट नगर, चंद्रपूर) याचा धाबा होता आणि त्याचा जावई सुनील रमेश साखरकर (रा. मोरवा) याचा त्या ठिकाणी पानटपरी होती. दोघेही एकमेकांचे सासरे-जावई आहे. त्यांच्या धाब्यावर चंदू कांबळे काम करत होता. तो त्याची पत्नी व दोन मुलांसह राहत होता. 17 ऑगस्ट 2011 रोजी नागो रेडलावार तो धाब्यावर आला, तेव्हा चंदू कांबळे याने त्याचा तीन महिन्यांचा पगार मागीतला. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. तेव्हा नागो रेडलावारने चंदू कांबळेला खोली खाली करण्यास सांगून त्याला थापड मारली. आधी माझ्या पगाराचे पैसे द्या, अशी मागणी कांबळे याने लावून धरली. तेव्हा रेडलावार याचा जावई सुनील साखरकर आला. त्याने चंदू कांबळेचे हात पकडले आणि रेडलावार याने चाकूने त्याच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. चंदू कांबळे याला वाचविण्यासाठी त्याची पत्नी आली असता रेडलावार याची पत्नी शहनाज हिने तिला पकडून ठेवले. रेडलावारने तिला सुद्धा चाकूने मारून जखमी केले. दोघांना उपचारार्थ दवाखान्यात नेले असता त्यांना मृत्यू झाला होता.

आजन्म कारावासाची शिक्षा आणि दोषी फरार -

17 ऑगस्ट 2011 ला भादवी कलम 302, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात आरोपी नागो रूषी रेडलावार, सुनिल रमेश साखरकर आणि शहनाज सलीम शेख यांना अटक करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आपली शिक्षा नागपूर कारागृह येथे भोगत असताना 4 जून 2013 रोजी 15 दिवस पॅरोल रजेवर आले परंतू कारागृहात न जाता ते फरार झाले. यावेळी या आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

तब्बल नऊ वर्षांचा शोध आणि अटक -

बरेच वर्षापासून पोलीस स्टेशन रामनगर, घुग्घूस, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे त्यांचा शोध घेत होते. परंतू आरोपीचा कोणताही थांगपत्ता किंवा ठोस पुरावा मिळत नव्हता. त्यांचे नातेवाईक, मित्र परीवार व सबंधीतांची सुद्धा विचारपूस करण्यात आली. परंतू त्यात सुद्धा त्यांचा कुठलाही मागमूस आढळून आला नाही. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सुगावा लागला. आरोपी सासरा आणि जावई हे आपले नाव आणि ओळख बदलवून तेलंगणातील आदीलाबाद जिल्ह्यातील मौजा पोनाला येथे राहत होते, अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक नेमण्यात आले. या दरम्यान आरोपी हे महाराष्ट्रतील पारडी या गावात येत असल्याबाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. हे दोघे दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी आपले नाव नागेश मडावी आणि सुनील गेडाम असे सांगितले. त्यांची अधिक चौकशी केल्यावर त्यांनी आपली खरी ओळख सांगितली. नऊ वर्षांपासून पोलिसांना चकमा देणारे आरोपी पकडले गेले.

हेही वाचा -Pegasus Snooping : नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details