महाराष्ट्र

maharashtra

जेट एअरवेजबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सभापतींच्या दालनात होणार बैठक

By

Published : Jun 25, 2019, 4:40 PM IST

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याने कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर आल्याचे सांगितले.

जेट एअरवेज

मुंबई - नफ्यात सुरू असलेली जेट एअरवेज विमान कंपनी रातोरात का बंद पडली, याविषयी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हस्तक्षेप करत हा विषय गंभीर असल्याचे म्हटले. त्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या दालनात बैठक घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याने कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर आल्याचे सांगितले. त्यांना न्याय मिळाला नसल्याची बाब मांडत याविषयीची चौकशी करण्याची मागणी केली.


जेट एअरवेज कंपनी एका रात्रीत बंद का पडली, असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला. या कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. ही कंपनी केंद्राच्या अखत्यारीत असली तरी या सदनात हा विषय मांडण्यात आला आहे. सभागृहाच्या नियमानुसार सदस्य जी माहिती देतो ती खरी समजून त्याची माहिती सरकारने द्यायला हवी, अशी त्यांनी मागणी केली. जेट एअरवेज कंपनीत असणारे नवरा- बायको रस्त्यावर आले आहेत, अशी माहितीही मुंडे यांनी सभागृहाला दिली.


जेट एअरवेजचे कर्मचारी आणि अधिकारी यांना न्याय देण्यासाठी दिल्लीत यासंदर्भात बैठक कधी घेणार, असा त्यांनी सवाल केला. तसेच किती दिवसात न्याय देणार असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाची सभापतींनी गांभीर्याने दखल घेवून दालनात बैठक घेणार आहे.

Intro:जेट एअरवेजच्या विषयावर होणार सभापतींकडे बैठक

मुंबई ता. २५ :
मुंबईत स्थापन झालेली आणि नफ्यात सुरू असलेली जेट एअरवेज कंपनी ही विमान प्रवासी वाहतूक सेवा देणारी कंपनी रातोरात का बंद पडली, याविषयी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात बैठक होणार आहे. यासंदर्भात कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधीपक्ष सदस्यांचे समाधान न झाल्याने सभापतींनी याविषयी हस्तक्षेप करत हा विषय गंभीर असल्याने त्याविषयी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सभापतींच्या दालनात बैठक घेणार असल्याचे सभापतींनी जाहीर केले.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरण पावसकर यांनी जेट एअरवेज कंपनी बंद पडल्याने कर्मचारी व अधिकारी रस्त्यावर आले त्यांना न्याय मिळाला नसल्याची बाब मांडत याविषयीची चौकशी करण्याची मागणी केली. जेट एअरवेज कंपनी एका रात्रीत बंद का पडली असा सवाल करतानाच या कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. भले ही कंपनी केंद्राच्या अखत्यारीत असली तरी या सदनात हा विषय मांडण्यात आला आहे. या सदनाचा नियम आहे की, सदस्य जी माहिती देतो ती खरी समजून त्याची माहिती सरकारने द्यायला हवी. आज नवरा- बायको जेट एअरवेज कंपनीत होते ते रस्त्यावर आले आहेत अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच एका रात्रीत ही जेट एअरवेज कंपनी का बंद पडली व कर्मचारी आणि अधिकारी यांना न्याय देण्यासाठी दिल्लीत यासंदर्भात बैठक कधी घेणार व जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना न्याय किती दिवसात देणार मुंडे यांनी केली होती. त्यावर सभापतींनी आपल्या दालनात बैठक घेत असल्याचे स्पष्ट केले.
Body:जेट एअरवेजच्या विषयावर होणार सभापतींकडे बैठक
Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details