महाराष्ट्र

maharashtra

अट्टल दुचाकी चोरट्यांना बुलडाणा पोलिसांनी ठोकल्या बेड्या,दोन देशी कट्टयांसह १३ दुचाकी जप्त

By

Published : Mar 4, 2021, 7:15 PM IST

जिल्ह्यासह परजिल्ह्यात दुचाकी चोरी करणा-या टोळीला बुलडाणा पोलिसांनी जेरबंद केले आहे. बुलडाणा स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. आरोपींकडून १३ दुचाक्यासह दोन देशी कट्टे, तीन मॅगझीन, सात जीवंत काडतुसे, व एक मोबाईल असा एकुण १८ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी या कारवाईची माहिती दिली.

buldhana police
बुलडाणा पोलिस कारवाई

बुलडाणा:- जिल्ह्यासह परजिल्ह्यात दुचाकी चोरी करणा-या टोळीला बुलडाणा पोलिसांनी जेरबंद केले आहे. बुलडाणा स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. आरोपींकडून १३ दुचाक्यासह दोन देशी कट्टे, तीन मॅगझीन, सात जीवंत काडतुसे, व एक मोबाईल असा एकुण १८ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांनी या कारवाईची माहिती दिली.

बुलडाणा जिल्हयातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनेला गंभीरतेने घेते जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी दुचाकी चोरणाऱ्या आरोपी विरुध्द कठोर कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव व पोलीस उपनिरिक्षक निलेश शेळके यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले.दरम्यान बुलडाणा तालुक्यातील डोंगरशेवली येथील सोमनाथ बाबुराव सावळे वय ३० ह.मु. मांजरी खुर्द ता. हवेली जि. पुणे हे दुचाकी वाहनांची चोरी व विक्री करीत असल्याचा गोपनीय माहितीवरून बाबुराव यास वरवंड फाटा येथून अटक करून त्याची झडती घेतली असता, त्याचेकडे दोन देशी कट्टे, सात जिवंत काडतुस, एक स्कुटी व एक मोबाईल असा एकुण २ लाख ४५ हजार रुपयाचा माल मिळुन आला. प्रकरणी त्याची सखोल चौकशी केली असता स्कुटी व मोबाईल पुणे येथुन चोरुन आणल्याची त्याने कबुली दिली. या कबुली नुसार त्याचा साथीदार गोपाल कोंडु चव्हाण वय २१ रा. डोंगरखंडाळा याच्याकडुन पुणे जिल्हयातुन चोरलेल्या तीन बुलेट जप्त केल्या आहेत उपरोक्त आरोपींनी आणखी गुन्हे केल्याची दाट शक्यता असल्याने त्यास व त्याचे इतर साथीदार मयुर अनिल राठोड वय २०, शैलेश सुरेश जाधव वय २० तिन्ही रा. डोंगरखंडाळा, मंगेश बबन जेऊघाले वय २२ रा. वरवंड अशा पाचही
आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची विचारपुस केली असता, त्यांनी बुलडाणा व पुणे जिल्हयात मागील वर्षभरापासुन विविध कंपन्याच्या ब-याच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

बुलडाणा जिल्ह्यातील ११ तर पुणे जिल्ह्यातील ६ गुन्हे उघडकीस
या दुचाकी चोरी प्रकरणी बुलडाणा जिल्हयातील दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघडकिस आले आहेत. तर पुणे जिल्हयातील दुचाकी चोरीचे सहा गुन्हे असे एकुण सतरा गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीना पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक. खामगाव हेमराजसिंग राजपुत, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरिक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप आढाव व पोलीस अंमलदार सुधाकर काळे, दिपक पवार, सुनिल
खरात, गणेश शेळके, युवराज शिंदे व चालक राहुल बोर्डे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details