महाराष्ट्र

maharashtra

दोन मोबाईल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

By

Published : Jan 28, 2021, 10:48 PM IST

मेहकर शहरातील माळीपेठ येथे संशयास्पद फिरणाऱ्या दोघांकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी केली असता त्यातील एकाच्या खिशात चोरीचे दोन मोबाईल सापडले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना मेहकर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

आरोपीसह पोलीस पथक
आरोपीसह पोलीस पथक

बुलडाणा - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोबाईल चोरट्याला मेहकर शहरातील माळीपेठ येथून ताब्यात घेतले आहे. त्याकडून पंधरा हजाराचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आमिर खॉ इब्राहिम खा व असलम खा इमायत खा, असे मोबाईल चोरट्याचे नावे आहे.

मेहकर येथील रामनगर परिसरातून मोबाईल चोरल्याची कबुली

मागील अनेक दिवसांपासून मेहकरसह परिसरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहकर येथील माळीपेठ परिसरातील असलम खा इमायत खा (वय 24, रा. माळीपेठ, मेहकर) व आमिर खॉ इब्राहिम खा (रा.घरकुल कॉलनी, मेहकर) हे दोघे संशयास्पदरित्या फिरत होते. त्यांना ताब्यात घेऊन पथकाने त्यांची झाडाझडती घेतली असता. असलम खा इमायत खाच्या पॅन्टच्या खिशात दोन मोबाईल आढळले. हे मोबाईल त्याने मेहकर येथील रामनगर परिसरातून चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. या प्रकरणी दोघांविरोधात कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशीसाठी त्याला मेहकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हेही वाचा -अवघ्या 300 रुपयांच्या वादातून एकाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details