महाराष्ट्र

maharashtra

Accident : बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर अपघात, तीनजण ठार

By

Published : Feb 12, 2023, 3:30 PM IST

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रिय महामार्ग क्रमांक सहा वरील तांदुळवाडी पूलावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीनजण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज रविवार (दि. 12 फेब्रुवारी)रोजी सकाळी घडली आहे. यातील जखमींना तत्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून घटनेची पाहणी केली आहे.

accident on the national highway
accident on the national highway

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर ट्रक व मेटाडोर समोरासमोर भिषण धडक झाली. ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले. तर 1 जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बुलढाणा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. यातील जखमींना तत्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून घटनेची पाहणी केली आहे.

घटनाक्रम : मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील (ट्रक क्रमांक MH 48 J 0061) हा विटांचा माल घेवून दसरखेडकडून मलकापुरकडे जात होता. त्यावेळी मेटाडोरला (टिप्पर क्रमांक MH 46 AF2782)ने सकाळच्या सुमारास दसरखेड नजीक असलेल्या तालसवाडा पुलाजवळ भिषण धडक दिली. या धडकेत आयशच्या समोरच्या भागाचा अक्षरश चुराडा झाला. यामध्ये राजू रतन चव्हाण (वय 37), जीवन सुरेश राठोड (वय 27) व सुनिल ओंकार राठोड (वय 33) रा. मोहेगाव यांचा घटनास्थळी दुदैवी मृत्यू झाला आहे. तर, राम मलखंब राठोड (वय 26) याच्यावर बुलढाणा येथील एक हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details