महाराष्ट्र

maharashtra

महावितरणाच्या हलगर्जीपणामूळे शॉक लागून 'त्या' कर्मचाऱ्याचा मृत्यू, तपास सुरू

By

Published : May 19, 2021, 6:51 PM IST

Updated : May 19, 2021, 7:32 PM IST

कंत्राटी कर्मचाऱ्याचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्याला कोणतेही सुरक्षा उपकरणे न देता त्याला विद्यूत खांबावर चढून त्याला तार दुरुस्त करायला लावली. विद्यूत प्रवाह थांबवून काम करत असताना अचाना विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने त्या कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत चौकशी करुन संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे इशारा कार्यकारी अभियंता माळोदे यांनी दिला आहे.

महावितरण
महावितरण

बुलडाणा -शहरातील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या बाजूच्या लघु दाब वाहिनीच्या विद्युत खांबावर चढून काम करत असतांना तारेमध्ये अचानक विद्यूत प्रवाह सुरू झाल्याने महावितरणामधील कंत्राटी कर्मचारी योगेश काळे (वय 26 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास बुलडाणा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीनकुमार माळोदे हे करत असून मृत योगेश काळे यांची सेवेचा कार्यकाळ संपल्यावरही त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून काम करण्यास लावले. दरम्यान, काम करत असताना शॉक लागू नये यासाठी संरक्षक साधने न देता काम करून घेतल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असून तपासात निष्पन्न झालेल्या दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा कार्यकारी अभियंता माळोदे यांनी दिला आहे. तर डीपीमधील विद्यूत पुरवठा खंडित असताना तारेमध्ये विद्यूत पुरवठा कोठून आला याचा शोध घेणे सुरू आहे.

माहिती देताना कार्यकारी अभियंता

चिखली रोडवरील उप वनसंरक्षक कार्यालयातील खांबावरील पथदिव्याचे तारे तुटल्याने ते तार जोडण्यासाठी उप वनसंरक्षक कार्यालयाच्या बाजूच्या लघु दाब वाहिनीच्या विद्यूत खांबावर चढून सोमवारी (18 मे) सायंकाळी योगेश काळे हा त्याचा कार्यकाळ संपल्यानंतरही काम करत होता. काम करण्यासाठी त्या परिसरातील विद्यूत प्रवाह बंद करण्यात आला होता. मात्र, तारेमध्ये अचानपणे विद्यूत प्रवाह सुरू झाला. त्यामुळे योगेशला विजेचा झटका बसला. यावेळी बुलडामा नगर परिषदेच्या मदतीने योगेश काळेला खांबावरून खाली उतरून ताबडतोड जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योगेशला वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयश आले. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी योगेश काळे याला मृत घोषित केले होते. दरम्यान, विजेचे काम करताा कनिष्ठ अभियंता त्या ठिकाणी उपस्थित राहून नियमाने काम करुन घेणे गरजेचे होते. मात्र, घटनास्ठळी कनिष्ठ अभियंता जाधव गैरहजर असल्याचे समोर आले आहे.

दोषींवर कारवाईचा इशारा

या प्रकरणाचा विद्यूत निरीक्षकांमार्फत तपास सुरू असून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा बुलडाणा विगाभाचे कार्यकारी अभियंता माळोदे यांनी दिला आहे. डीपीमधील वीज पुरवठा खंडित करूनही मृत योगेश काम करत असतांना तारेमध्ये वीज पुरवठा कोठून आला याचा शोध घेणे सुरू आहे.

हेही वाचा -'मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून भाजपा आंदोलनात सहभागी होणार'

Last Updated : May 19, 2021, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details