महाराष्ट्र

maharashtra

स्वाभिमानीकडून आगळवेगळ आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न

By

Published : Jun 6, 2021, 2:27 AM IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन लोणार तालुक्यातील भूमराळा येथे दगडाची पेरणी करून केले.

स्वाभिमानीकडून आगळवेगळ आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न
स्वाभिमानीकडून आगळवेगळ आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न

बुलडाणा - शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वात शनिवारी (5 जून) रोजी आगळंवेगळं आंदोलन करण्यात आले. लोणार तालुक्यातील भूमराळा येथील काळूबा लाड यांच्या शेतात दगडाची पेरणी करून, शेतकऱ्यांच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात करण्यात आली.

स्वाभिमानीकडून आगळवेगळ आंदोलन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न
'बियाणे उपलब्ध नाही'

कोरोना महामारीमुळे लॉकडाउन झाल्याने शेतकऱ्यांना माल विकता आला नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या शेत मालाचं मोठं नुकसान झाले. अशातच मागील वर्षी बोगस बियाण्यामुळे, अतिवृष्टीची मदत न मिळाल्यामुळे आणि पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे. सध्या पेरणीचे दिवस असतांना बियाणे उपलब्ध नाहीत. तर, जीवनावश्यक वस्तूंचे भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये शेतकर्‍यांना यावर्षी पेरणी कशी करावी ? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे दगड पेरणी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details