महाराष्ट्र

maharashtra

पीक विम्यासाठी 'स्वाभिमानी' आक्रमक, आमदाराच्या घरासमोर आंदोलन करण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना अटक

By

Published : Jun 16, 2021, 9:54 PM IST

शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे या विम्याच्या रक्कमेसाठी आमदारांना बोलके करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमदारांच्या घरासमोर आंदोलन सुरू केले आहे. त्याची सुरवात जळगाव जामोद मतदार संघाचे भाजपाचे आमदार डॉ.संजय कुटे यांच्या घरासमोर आंदोलन करून होणार होती. मात्र, आंदोलन करण्यापूर्वीच विदर्भातील स्वाभिमानीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना संग्रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले.

बुलडाणा
बुलडाणा

बुलडाणा - पीक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा विमा मिळत नाही. त्यावर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार काहीच बोलत नाहीत, असा आरोप करत त्यांना बोलते करण्यासाठी बुधवारपासून (16 जून) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर आंदोलन पुकारले आहे. त्याची सुरुवात जळगाव जामोद मतदार संघाचे भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या घरासमोर आंदोलन करून होणार होती. मात्र, आंदोलन करण्यापूर्वीच आज सकाळीच विदर्भातील स्वाभिमानीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना संग्रामपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.

विदर्भातील स्वाभिमानीचे अध्यक्ष प्रशांत डिक्कर

आंदोलनपूर्वी अटक केल्याने आमदाराचा निषेध -

आंदोलनापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले. त्यामुळे या अटकेच्या निषेधार्थ प्रशांत डिक्कर यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत आमदार पीक विमा कंपनीविरोधात आवाज उठवणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशाराही डिक्कर यांनी दिला. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर प्रशांत डिक्करसह कार्यकर्त्यांनी संग्रामपुर पोलीस ठाण्यातच उपोषण सुरू केले. 'पोलीस प्रशासनावर दबाव टाकून शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे आमदारांचा जाहीर निषेध. विमा कंपनीसोबत साटेलोटे करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांना कदापी सोडणार नाही', असे डिक्कर यांनी यावेळी म्हटले.

यासाठी आमदाराच्या घरापुढे आंदोलन

गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या पिकांचा विमा उतरवला होता. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध आंदोलने केली. पत्रव्यवहारही केला. मात्र, विमा कंपनीकडून कुठलीच दखल घेतली नाही. या संदर्भात आमदारही बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे आमदारांना बोलते करण्यासाठी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा -येवल्याच्या आम्रपालीची गायनाची धमाल

ABOUT THE AUTHOR

...view details