महाराष्ट्र

maharashtra

ST Strike : आमचे सरकार असताना तरी कुठे झाले एसटीचे विलीनीकरण? - जानकर

By

Published : Nov 21, 2021, 1:51 PM IST

रोडवर एक बोलावे लागते आणि आतमध्ये एक असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर (RSP Leader Mahadev Jankar) यांनी केले आहे. आंदोलन (st strike maharashtra) झाल्यानंतर रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते बुलडाण्यात (Buldana) आले असता बोलत होते.

महादेव जानकर
महादेव जानकर

बुलडाणा - आमचे सरकार असताना तरी कुठे झाले होते एसटीचे विलीनीकरण असा सांगत रोडवर एक बोलावे लागते आणि आतमध्ये एक असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी मंत्री महादेव जानकर (RSP Leader Mahadev Jankar) यांनी केले आहे.

महादेव जानकर

'रस्त्यावर एक असते आणि आत गेल्यावर एक'

आंदोलन (st strike maharashtra) झाल्यानंतर रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते बुलडाण्यात (Buldana) आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते. ते म्हणाले, की सध्या राज्यभर एसटी विलीनीकरणाचा मुद्दा गाजत आहे. कर्मचारी संपावर आहेत. सरकार चर्चा करत आहे, मात्र कर्मचारी मागे हटण्यास तयार नाही. विलीनीकरणावर ते ठाम आहेत. मात्र आमचे सरकार असताना तरी कुठे झाले विलीनीकरण, रस्त्यावर एक असते आणि आत गेल्यावर एक असते, असे ते म्हणाले.

'जनतेने हुशार व्हावे'

सरकारमध्ये असताना सिस्टीममध्ये राहून काम करावे लागते. मात्र जनतेने, शेतकऱ्याने हुशार व्हावे. शिक्षण घ्यावे. क्लार्क होण्याऐवजी कलेक्टर व्हावे, सरपंच होण्याऐवजी आमदार व्हावे, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details