महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा; जामोद येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० जण ताब्यात

By

Published : Mar 14, 2021, 1:53 PM IST

बुलडाणा- जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका शेतातील फार्म हाऊसवर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने १० जुगाऱ्यांना ताब्यत घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार ६५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा
जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा

बुलडाणा- जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील एका शेतातील फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा टाकला. या छाप्यात दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पाच दुचाकी, जुगार साहित्य असा रोख रकमेसह एकुण २ लाख ५४ हजार ६५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १२ मार्च रोजी (शुक्रवारी) करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दहा जुगाऱ्यांना जुगाऱ्यांना अटक
जामोद परिसरात रमेश गोविंदा हागे हा आपल्या शेतातील फार्महाऊसमध्ये जुगार चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उपरोक्त ठिकाणी शुक्रवारी छापा टाकला. यावेळी जामोद येथील आरोपी रमेश गोविंदा हागे (वय ३५)
राजु सत्यनारायन जोशी (वय ४४), सुरेश शंकर भड (वय ३८), सैय्यद बिलाल सै. कदीर वय (३२), मधुकर शेषराव धुरडे (वय २६), सैय्यद निजाम सै. उस्मान (वय ५४) रा
जळगांव जामोद, कादर खाँ मोहम्मद खाँ (वय ३०), सबीरोद्दीन हसिमोद्दीन (वय ३०) वर्ष, राजू गोपाल हागे (वय ३०) व राजू महादेव हागे (वय ३५) वर्ष अशा दहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

२ लाख ५४ हजाराचा माल जप्त
यावेळी जुगाऱ्यांच्या ताब्यातून राेख ५९ हजार ६०० रूपये, १ लाख ९५ हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी असा एकूण २ लाख ५४ हजार ६५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details