महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Political Crisis : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजित पवारांमुळे रखडला होता, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा गौप्यस्पोट

By

Published : Jul 2, 2023, 9:02 PM IST

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्पोट केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अजित पवार यांच्या बंडामुळे थांबला होता, असा खुलासा संजय गाडकवाड यांनी केला आहे.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र

बुलडाणा :राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवार यांच्या प्रवेशासाठी मंत्रिमडळाचा विस्तार थांबला होता, असा गौप्यस्पोट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार यांचे बंड हे पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते. अजित पवार यांच्यासोबत 29 आमदारांनीही बंड केल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार संजय गायकवाड

मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला :शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शिंदे फडणवीस या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने अनेक आमदार नाराज होते. शिवसेनेतील सहयोगी पक्षातील आमदारांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. आमदार बच्चू कडू यांनी तर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र मंत्रिमंडळाचा हा विस्तार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या प्रवेशासाठी रखडल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. त्यामुळे आता मोठी चर्चा घडून येत आहे.

काय आहे प्रकरण :राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथेनंतर राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडाली आहे. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष म्हणून शपथ घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उरलेल्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर मोठी आगपाखड केली आहे. शपथ घेतलेल्या आमदारांना राष्ट्रवादी पक्षाचे समर्थन नसल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -

  1. NCP Political Crisisi : भावाच्या बंडानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया; एकाच शब्दात दिले उत्तर
  2. Maharashtra Political Crisis : ' ... म्हणून आम्ही एकत्र आलो, कोण क्लिन बोल्ड झाले हे सर्वांनी पाहिले'
  3. NCP Political Crisis : बंडखोर आमदारांनी माझ्याशी संपर्क साधला, लवकरच....; शरद पवारांची प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details