महाराष्ट्र

maharashtra

इंंग्रजी दारूसाठी काही पण! सीसीटीव्ही कॅमेरे फोडत पावणदोन लाखांची दारू लंपास

By

Published : Jun 2, 2021, 8:06 AM IST

Updated : Jun 2, 2021, 11:15 AM IST

सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बारामधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट फोडले व वाईनबारचे शटरचे लॉक तोडून बारमध्ये प्रवेश केला. बारमधील इंग्रजी दारू आणि रोख रक्कम असा 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.

दारू साठा
दारू साठा

बुलडाणा- लोणार तालुक्यातील बीबी येथील एका वाईनबारमधील लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून अज्ञात चोरट्यांनी चक्क इंग्रजी दारू लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कमेसह तब्बल पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे फोडत पावणदोन लाखांची दारू लंपास


वाईनबार शटरचे लॉक तोडून बारमध्ये केला प्रवेश
बीबी येथील रामदास काळे यांच्या मालकीचे संगम वाईनबार आहे. या वाईनबारमध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बारामधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट फोडले व वाईनबारचे शटरचे लॉक तोडून बारमध्ये प्रवेश केला. बारमधील इंग्रजी दारू आणि रोख रक्कम असा 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. वाईनबार मालक रामदास काळे यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बीबी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Last Updated :Jun 2, 2021, 11:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details