महाराष्ट्र

maharashtra

Fruit News: बुलढाण्याच्या पेरुची झेप परराज्यात! जेली चॉकलेट बनवण्यासाठी केला वापर

By

Published : Dec 12, 2022, 5:23 PM IST

सध्या बाजारपेठेत सर्वत्र पेरू दिसून येत आहे. पेरूचे उत्पादन सुरू झाले. मुंबई, हैदराबाद, निजामाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पेरू दाखल ( Guava fruit exported ) होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात 925 हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड केली गेल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

बुलढाणा जिल्ह्यातील पेरूची आवक वाढली

बुलडाणा: पेरू भारतीय बाजारपेठेत सहज उपलब्ध होत असला तरी, राज्यात जे पिकते त्याला परराज्यात चांगला दर मिळतो हे आता शेतकऱ्यांना चांगलेच उमगले आहे. बुलडाणा जिल्हा पेरूचे उत्पादन घेण्यात मागे नाही. वर्षाकाठी 2 लाख रुपये एकरी उत्पादन घेतल्या जात असून जिल्ह्यातील पेरूने परराज्यात गोडवा वाढविला ( Guava fruit exported ) आहे.

पेरूची परराज्यात निर्यात: सध्या बाजारपेठेत सर्वत्र पेरू दिसून येत आहे. पेरूचे उत्पादन सुरू झाले. मुंबई, हैदराबाद, निजामाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये जिल्ह्यातील पेरू दाखल होत आहे. खाण्यास गोड आणि प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या या पेरूचे देऊळघाट, पाडळी, साखळी, नांद्राकोळी, सागवान आदी गावामध्ये उत्पादन घेतले जाते.

925 हेक्टर पेरूची लागवड:एकदा पेरूची रोप लावल्यानंतर 5 वर्ष झाड मोठे व्हायला लागते. त्यानंतर मात्र हे झाड 30 वर्ष फळ देते. कच्चे पेरू अधिक पिकले की,अलाना चॉकलेट फॅक्टरीला आयात होते.बुलडाणा जिल्ह्यात 925 हेक्टर क्षेत्रावर पेरूची लागवड होते. अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. काही शेतकरी शहरांत पेरूचा माल पाठवायचे. त्याला वाहतूक खर्च लागायचा. सरासरी दर किलोला 30 रुपयांपर्यंत मिळायचा. त्यातून खर्च वजा जाता एकरी दीड लाख रुपये मिळायचे, असे तेथील शेतकरी सांगतात.


पेरूला चांगली मागणी: आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत पेरू विकतो. प्रतिकिलो दर 10 रुपये जादा मिळतात. त्यातून एकरी दीड लाख रुपये अधिकचे उत्पन्न मिळते. राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या असून, त्यामार्फत शेतमालाला चांगला दर मिळत आहे. बाहेर राज्यातील पेरू गोडीला कमी आहेत. त्यामुळे त्याची विक्री अपेक्षेनुसार होत नाही. त्यामुळे परराज्यांत त्याची विक्री केली जाते. पेरुला चांगली मागणी आहे,असे फळबागा विकत घेणारे बुलडाणा येथील व्यापारी हारून बागबान त्यांनी सांगितले.

पेरूची बाग मोठ्या प्रमाणात विकसित: या शेतकऱ्यांने पारंपारिक ऊसाची शेती सोडून पेरूच्या बाग लागवड करण्याचे ठरवले. लखनऊ 49 लखनऊ सफेद या प्रकारचे घेरदार पेरूचे गोड फळ देणाऱ्या बुलढाण्याच्या परिसरात सागवन नांद्राकोळी या परिसरात पेरूची बाग मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. यामध्ये वर्षाकाठी 2 लाख रुपये उत्पन्न होत असून वर्षाचा मेंटेनन्स खर्च 50 हजार रुपयांच्या आसपास जातो म्हणजे निवड नफा दीड लाख रुपये प्रति वर्ष मिळतो तसेच या फळांची मागणी पर राज्यात मोठ्या प्रमाणात केली जात आहे त्यामुळे या भागातील शेतकरी पेरूची बाग लागून भरघोस उत्पन्न मिळवू शकतात, असे शेतकरी सांगतात.

ABOUT THE AUTHOR

...view details