महाराष्ट्र

maharashtra

बुलडाण्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'एक वही एक पेन' अभियानाची सुरुवात

By

Published : Dec 6, 2020, 10:59 PM IST

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात महापुरुषांना अभिवादन हे वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून करण्यात येत आहे. या निमित्ताने बुलडाण्यात 'एक वही एक पेन' अभियानाची सुरुवात करण्यात आली.

आम्ही धम्म बांधव परिवार
आम्ही धम्म बांधव परिवार

बुलडाणा - विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुलडाण्यात 'एक वही एक पेन' अभियानाची सुरुवात करण्यात आली. 'आम्ही धम्म बांधव' या परिवाराकडून हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाची रविवारी 6 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली. तसेच चैत्यभूमीवर जाऊ न शकणारे बांधव बुलडाण्यातून पाचशे पत्र चैत्यभूमीवर पाठवून अभिवादन करणार आहेत.

कुणाल पैठणकर

आम्ही धम्म बांधव परिवाराच्यावतीने वर्षभरात विविध उपक्रम-

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात महापुरुषांना अभिवादन हे वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवून करण्यात येत आहे. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आम्ही धम्म बांधव परिवाराच्यावतीने वर्षभरात विविध उपक्रम राबवून मदतीचा हात पुढे केला जात आहे.

उपक्रमात जमा होणाऱ्या वही, पेन गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वाटप-

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एक वही, एक पेन हा उपक्रम ६ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील धम्म बंधूंनी शालेय साहित्य दान करून सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही धम्म बांधव या परिवाराकडून करण्यात आले आहे. जमा होणारे वही, पेन हे ग्रामीण भागातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबरला लाखो अनुयायी चैत्यभूमीवर जाऊन नतमस्तक होत असतात. मात्र या वर्षी कोरोनामुळे अनेक बंधने आली आहेत. त्यामूळे चैत्यभूमीवर पाचशे पत्र पाठवून अभिवादन करण्यात येणार आहे.

हेही वाचा-'बाबासाहेबांवरील संशोधनासाठी हे आंतरराष्ट्रीय स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल'

हेही वाचा-शेतकरी आंदोलन : भारत बंदला आप, काँग्रेस, टीआरएससह द्रमुकचाही पाठिंबा

ABOUT THE AUTHOR

...view details