महाराष्ट्र

maharashtra

Buldana News : आदिवासीबहुल नागरिकांसाठी खामगाव जिल्हा होणे आवश्यक...

By

Published : May 5, 2023, 8:25 PM IST

बुलढाणा येथील घाटाखाली सर्वात मोठे तालुक्याचे ठिकाण, बाजारपेठ सिल्वर सिटी म्हणून ओळख असलेले खामगाव हे अनेक वर्षांपासून जिल्हा म्हणून नावारूपास येण्यास प्रतीक्षा आहे. अनेक राजकीय मंडळींनी या जिल्हा प्रश्नाकडे फक्त निवडणुका दरम्यानच हात घातला. पण त्यानंतर या नवीन जिल्ह्याकरिता निराशाच हाती आली आहे.

Division of Buldhana District
बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन

माहिती देताना आकाश फुंडकर

बुलढाणा: खामगावात जिल्हा प्रशासनाची एक नवीन इमारत जवळपास संपूर्ण विभागानुसार तयार असल्यासारखीच आहे. अत्यंत गावाच्या सर्वांना सुकर होईल अशा अंतरावर इमारत आहे. 16 किलोमीटरवर असलेले संत नगरी शेगाव तसेच दुसऱ्या बाजूला 16 ते 18 किलोमीटरवर हनुमान नगरी म्हणजेच नांदुरा तालुका असे दोन उजव्या आणि डाव्या बाजूला असलेले हे दोन तालुक्याचे ठिकाण आहे. त्यातच पुढे जाऊन मलकापूर तर शेगावलाच तिकडे जळगाव जामोद संग्रामपूर असे थेट कनेक्ट असलेले हे तालुके आहेत. त्यामुळे खामगाव ते बुलढाणा आणि खामगाव ते अकोला या दोन पन्नास किलोमीटरच्या अंतराच्या मधोमध हे नवीन प्रस्तावित खामगाव जिल्हाचे स्थान बुलढाणा आजही जिल्ह्याचे ठिकाण असले तरी, तिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. तर तेच खामगावला खामगाव जलब असे मुख्य रेल्वे मार्गावर आणणार खामगावमध्ये रेल्वे स्टेशन आहे.

प्रस्ताव आहे प्रलंबित: हिंदुस्तान युनिलिव्हर हे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले नावाजलेले एक कंपनी ब्रँड, या एक ना अनेक गोष्टींमुळे दळणवळणचे सर्वसाधारण 24 तास रस्ता वाहतुकी करता मध्यवर्ती असलेले खामगाव शहर हे नवीन जिल्ह्याचे ठिकाण म्हणून योग्य आहे. पण मागील जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त हा प्रस्ताव एक प्रश्न म्हणूनच आजही प्रलंबित आहे. हा जिल्हा होणार आहे. मुख्यतः आदिवासी बहुल असलेले संग्रामपूर जळगाव जामोद या भागातील लोकांना तिथून बुलढाणा पर्यंत आपली सरकारी कामे, मुख्यतः कार्यालयीन अडचणी सरकार दरबारी पोहोचण्याकरता दोन ते अडीच तासाचा प्रवास करावा लागतो.

लवकरच हा जिल्हा होईल: आजही मागणी प्रलंबित आहे. ती अजून प्रतीक्षेत राहू नाही हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आजही प्रतीक्षेत आहे. ज्या मोदी लाटेमध्ये 2014 च्या वेळेस खुद्द नरेंद्र मोदी यांनी खामगावात सभेच्या वेळेस खामगावकरांना किंबहुना बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना साद घालत असताना लवकरच हा जिल्हा होईल हे संकेत दिले होते. ते देखील अद्याप 2024 च्या उंबरठ्यावर असताना प्रतीक्षेत आहे.

शंभर टक्के मागणी आहे : बुलढाणा जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या खूप विस्तारलेला जिल्हा आहे. जिल्हा मुख्यालय पोहोचण्यासाठी लोकांना खर्च करावा लागतो. बुलढाणा जिल्ह्यात जेव्हा विभाजन होईल तेव्हा खामगाव जिल्हा केला पाहिजे अशी मागणी आहे. त्याच मुख्यालय खामगाव असणाऱ्या अनेक खामगावला जळगाव जोडलेला मलकापूर जोडलेला आहे. सगळ्यांना यासाठी समान अंतर आहे. वरच्या जिल्ह्याचा जो बुलढाणा आहे ते मुख्यालय राहणार आहे. जिल्हा विभाजनाचा विषय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण जर या जिल्ह्याची विभाजन झाले तर त्याचे दोन्ही ठिकाणी अधिकारी उपलब्ध होतील. रखडलेले प्रकल्प विकास कामे मार्गी लागतील.

नवीन जिल्ह्यासाठी निराशाच:अनेक वर्षापासून खामगाव जिल्हा व्हावा ही मागणी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केली होती. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. घाटावरचा आणि घाटाखाली अशा दोन भागांमध्ये 13 तालुका असलेला हा जवळपास 25 ते 28 लाख लोकसंख्या असलेला सध्याचा बुलढाणा जिल्हा आणि यात घाटाखाली सर्वात मोठा तालुक्याचे ठिकाण बाजारपेठ सिल्वर सिटी म्हणून ओळख असलेले खामगाव हे अनेक वर्षांपासून जिल्हा म्हणून नावारूपास येण्यास प्रतीक्षा आहे. अनेक राजकीय मंडळींनी या जिल्हा प्रश्नाकडे फक्त निवडणुका दरम्यानच हात घातला. पण त्यानंतर या नवीन जिल्ह्यासाठी निराशाच हाती आली.

हेही वाचा: Bacchu Kadu on Vajra Muth Sabha वज्र मूठ कधी तुटेल हे सांगता येत नाही बच्चू कडू यांचे मोठे विधान

ABOUT THE AUTHOR

...view details