महाराष्ट्र

maharashtra

Buldhana Police Action: कॅफेमध्ये 'केबिन सुविधा'; अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर पोलिसांची कारवाई

By

Published : Mar 3, 2023, 11:44 AM IST

शहरातील विविध कॅफेवर द्वार बंद सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी या कॅफेंचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा शहरात उघडकीस आला आहे. अश्लील चाळे करणाऱ्या विद्यार्थ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेल्या निवेदनानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.

Buldhana Crime News
बुलढाणा शहर पोलीस

प्रतिक्रिया देताना प्रल्हाद काटकर ठाणेदार बुलढाणा शहर पोलीस

बुलडाणा : सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले होते. शहरात ठिकठिकाणी कॉफी कॅफे थाटण्यात आले आहे. या कॅफेमध्ये द्वार बंद केबिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या द्वार बंद केबिनचा अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी गैरफायदा घेत असल्याची तक्रार सकल मराठा समाजाकडून करण्यात आली होती. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत तब्बल 15 कॅफेंवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावेळी अश्लील चाळे करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर एका कॅफे मालकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सकल मराठा समाजाच्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.


बंदद्वार कॅबिनमध्ये अश्लील चाळे :बुलढाणा शहरात कॅफे मालकांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. या कॅफेमध्ये कॅबिनची सुविधा देण्यात आली आहे. तरुणाईला त्याची भुरळ पडत आहे. अनेक तरुण या ठिकाणी बंद द्वार कॅबिनमध्ये अश्लील चाळे करत असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत. त्यासाठी सकल मराठा समाजाकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तक्रार देण्यात आली आहे. शहरातील बंद द्वार कॅफेमध्ये अनेक तरुण-तरुणी अश्लील चाळे करत आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित होऊ शकते. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरनी लक्ष घालून तात्काळ आक्षेपार्ह कॅफे बंद करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.


कॅफे मालकांसाठी कडक इशारा :कॅफे मालकांसाठी कडक इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. रोज हे कॅफे चेक केले जातील. ज्या कॅफेमध्ये गैरप्रकार आढळून येतील, त्या कॅफे मालकांवर तसेच येथील असलेल्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांचे लायसन्स सुद्धा रद्द करण्याची प्रक्रिया पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. सर्व जनतेला आव्हान करतो की, आपले जे मुलं आहेत ते. जे शिकायला बुलढाण्यामध्ये येतात ते काय करतात? कुठे जातात? यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवने अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी घरून गेला, नंतर तो शिकायला गेला. तिकडे तो काय करत आहे? कॅफेमध्ये जात आहे. मुलींसोबत फिरत आहे, याची सुद्धा चौकशी केली पालकांनी केली पाहिजे. असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Sexual Assaulting Minor Girl: पनवेल रेल्वे स्थानक परिसरात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

ABOUT THE AUTHOR

...view details