महाराष्ट्र

maharashtra

Accident on Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ; एक ठार, 20 ते 23 प्रवासी जखमी

By

Published : Jan 20, 2023, 9:41 AM IST

गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. आज सकाळी नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 20 ते 23 प्रवासी जखमी तर एक प्रवासी ठार झाला.

Accident on Samriddhi Highway in Buldhana
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात

बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर सकाळी साडेचार वाजता देऊळगावराजा नजिक असोला गावाजवळ एमएच 20 ईएल 4999 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स पलटी झाली. ही ट्रॅव्हल नागपूर ते औरंगाबाद येथे जात होती. या अपघातामध्ये 20 ते 23 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानतंर रस्ताच्या बाजुला उभ्या असलेल्या एका प्रवाशाला ट्रकने चिरडले. त्याचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताची मालिका सुरू : जखमींना सिंदखेड राजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून उद्घाटन झाल्यानंतर जवळपास 11 डिसेंबर ते 19 जानेवारी म्हणजे 40 ते 45 दिवसात जवळपास वीस अपघात झाले आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक दुसऱ्या दिवशी इथे अपघाताची घटना घडत आहे. समृद्धी महामार्गावरील अनियंत्रित वेगाला आवर घालणे गरजेचे आहे.


लक्झरी बसचा भीषण अपघात :नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या राही ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 21 प्रवासी जखमी झाले आहे. हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नजीकच्या असोला फाटा गावाजवळ झाला आहे. अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर निघून महामार्गाच्या बाजूला जात असताना मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, एक प्रवासी गंभीर जखमी आहे.

बस महामार्गाच्या मध्यभागी पलटली :अपघातानंतर बस समृद्धी महामार्गाच्या मध्यभागी पलटली होती. या अपघाताग्रस्त बसमधून प्रवासी बाहेर पडत होते. यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन प्रवाशांना चिरडले. यामध्ये एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. एकूण 21 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, जखमींना देऊळगाव राजा आणि जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातांचा महामार्ग : घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त बस महामार्गाच्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. हा अपघात आज सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत. राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. या महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागपूर ते शिर्डी अशा ५२० किलोमीटर टप्प्याचे 11 डिसेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर हा महामार्ग सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरील वेगमर्यादा ही 120 किमी प्रतितास इतकी आहे. यामुळे एकही चूक मोठी ठरू शकते. रस्ता चांगला आहे, पण अति वेग मारक ठरत असल्याचे दिसत आहे. तर अनेक वेळा रात्रीचा प्रवासही घातक ठरत आहे.

हेही वाचा :Mumbai Goa Highway Accident : मुंबई, गोवा महामार्गावर भीषण अपघात; 9 जण ठार

ABOUT THE AUTHOR

...view details