महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा : राजूर घाटात 400 फूट खोल दरीत ट्रक कोसळला, चालकाचा मृत्यू

By

Published : May 11, 2021, 4:49 PM IST

Updated : May 11, 2021, 4:55 PM IST

बुलडाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील राजूर घाटात 400 फूट दरीत ट्रक कोसळला. या अपघातात ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.

A truck crashed into a 400 feet deep valley
A truck crashed into a 400 feet deep valley

बुलडाणा - शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील राजूर घाटात 400 फूट दरीत ट्रक कोसळून अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी 11 में रोजी घडली. या अपघातात ट्रक चालक पीर मोहम्मद यांचा जागीच मृत्यू झाला असून शेद्रुन मौज खान जखमी झाला आहे.

अग्निशामक दलाने मृतदेह दरीतून काढला -

राजूर घाटात 400 फूट खोल दरीत ट्रक कोसळला
बुलडाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील राजूर घाटात आर.जे.02 जी.बी.0924 या क्रमांकाचा ट्रक नारळ घेवून मलकापूरच्या दिशेने जात होता. हनुमान मंदिराजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळला. ट्रक इतका खाली गेला होता की, तो दिसत नव्हता. या अपघातात ट्रक चालक पीर मोहम्मद यांचा मृत्यू झाला तर शेद्रुन मौज खान हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.

घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्यांनी बुलडाणा शहर पोलिसांना दिली, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रक 500 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशामक वाहनातील दोरीच्या साहाय्याने पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी दरीत उतरून मृतदेह व जखमीला वर काढण्यात आले. जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, पुढील तपास बुलडाणा शहर पोलीस करीत आहे.

Last Updated :May 11, 2021, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details