महाराष्ट्र

maharashtra

आमदार भोंडेकरांची अन्न पुरवठा विभागाच्या गोदामावर धाड; मिलर्स, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

By

Published : May 29, 2020, 3:08 PM IST

Updated : May 29, 2020, 5:23 PM IST

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शासकीय धान्य पुरवठा गोदामावर धाड टाकली. गोदामातील धान्य निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप त्यांनी केला. राईस मिलर्स आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भोंडेकर यांनी केली. दुसरीकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी गोदामातील धान्याचा दर्जा शासनाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे असल्याचे सांगितले.

food distribution warehouse
अन्न पुरवठा विभागाचे गोदाम

भंडारा- आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील शासकीय गोदमावर धाड मारली. यावेळी आढळलेला सर्व तांदूळ आणि गहू अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत धान्य पुरवठा करणारे मिलर्स आणि त्यांना सहकार्य करणारे जिल्हा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पणन अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी भोंडेकर यांनी केली आहे. राईस मिलर्स कडून मिळणारे तांदूळ, गहू आणि डाळ निकृष्ट दर्जाचे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

दरवर्षी आधारभूत धान खरेदी केंद्रांवरून मिलर्सला धानापासून तांदूळ बनविण्यासाठी ( भरडाई साठी) धान दिले जातात. मिलर्स चांगल्या क्वालिटीचे धान घेऊन जातात. मात्र, तांदूळ पुरवठा करताना मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये साठवलेला निकृष्ट तांदूळ शासनाला पुरवठा करतात. हे धान्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिक धान्य पुन्हा बाजारात विकत असल्याचे चित्र दिसून येते. यासंदर्भातील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा येथील शासकीय गोदामावर धाड टाकली. तहसीलदार पोयाम,अन्न पुरवठा निरीक्षक पडोळे यावेळी उपस्थित होते.

गोदामातील तांदूळ,तुळ दाळ याचे वाटप थांबविण्याच्या सूचना नरेंद्र भोंडेकर यांनी दिल्या. निकृष्ठ दर्जाचा तांदूळ शासकीय गोदामात जमा करणाऱ्या राईस मिलर्सना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली.

अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या तपासणीत ४ राईस मिलचा १०८० क्विटल तांदूळ रद्द केला मात्र ९ राईसमिलचा ६१०८.९४ क्विटल तांदूळ पास केला होता. याविषयी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना विचारले असता, त्यांनी आम्ही तपासणी केली असता तपासणीमध्ये या धान्याचे क्वालिटी रिपोर्ट ठरवलेल्या निकषानुसार आहेत. जे धान्य निकषानुसार नसते ते राईस मिलर्सना परत पाठवले जाते ,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड यांनी सांगितले.

Last Updated :May 29, 2020, 5:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details