महाराष्ट्र

maharashtra

ब्रेक द चेन : भंडारा जिल्ह्यातील किराणा व्यापाऱ्यांनी स्वतःहून केली दुकाने बंद

By

Published : Apr 17, 2021, 4:35 PM IST

Updated : Apr 17, 2021, 4:44 PM IST

भंडारा जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तू असलेल्या किराणा दुकानेही आता बंद राहणार आहेत. ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वतः भंडारा किराणा व्यापारी संघटनेने घेतला आहे. 17 ते 20 या दरम्यान ही दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. कोरोनाची चैन तोडण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा किराणा व्यापारी संघटनेने सांगितले आहे.

glossary shop close
glossary shop close

भंडारा - 15 एप्रिलपासून महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंचे दुकान सोडता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तू असलेल्या किराणा दुकानेही आता बंद राहणार आहेत. ही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वतः भंडारा किराणा व्यापारी संघटनेने घेतला आहे. 17 ते 20 या दरम्यान ही दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. कोरोनाची चैन तोडण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा किराणा व्यापारी संघटनेने सांगितले आहे. तर शनिवारपासून भाजी विक्रीची वेळ ही दुपारी दोन तर किराणा दुकाने सुरू राहण्याची वेळ ही चार वाजेपर्यंत ठेवली जाणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेला आहे.

भंडाऱ्यात किराणा व्यापाऱ्यांनी स्वतःहून केली दुकाने बंद
महाराष्ट्रात भंडारा 8 व्या स्थानी -
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दहा हॉटस्पॉटमध्ये भंडारा जिल्ह्याचा दहावा नंबर होता. मात्र जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भंडारा जिल्हा महाराष्ट्रातील दहा हॉटस्पॉट पैकी आठव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. औरंगाबाद सारख्या मोठ्या जिल्ह्यालाही भंडारा जिल्ह्याने मागे सोडले असून भंडारा जिल्ह्यात सध्या 13,987 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात कोरोनाची दाहकता किती याचा सर्वांनाच अनुभव येत आहे.
ब्रेक द चेंन साठी घेतला निर्णय -
अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकान चालू ठेवण्याचा निर्णय जरी शासनाने घेतला असला तरी किराणा दुकानांवर होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी हे अडचणीचे ठरत होते आणि त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या आळा घालण्यासाठी भंडारा जिल्हा किराणा संघटनेने स्वतःहून निर्णय घेत आपली दुकाने पुढचे चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारपासून मंगळवारपर्यंत भंडारा जिल्ह्यातील किराणा दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
भाजीपाला आणि किराणासाठी नवीन वेळ -
अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने आणि भाजीपाला दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या दुकानांवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही ठोस पावले उचलत या दुकानांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. भाजीपाल्याची दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार असून किराणा दुकाने हे दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचा नवीन आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेला आहे. तसेच भाजीपाला विक्रीसाठी शहरातील खुल्या जागांवर नव्याने व्यवस्था करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर मटण मार्केटही शहराबाहेर नेण्यात आले आहे. जिल्ह्यातील संचारबंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे. त्यामुळे शहरातील रस्ते सध्या निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे. केवळ मोजकेच लोक रस्त्यांवर दिसत आहेत.
Last Updated : Apr 17, 2021, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details