महाराष्ट्र

maharashtra

भंडारा जिल्ह्यात वर्षभरानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

By

Published : Jul 1, 2021, 8:54 PM IST

कोरोनाचा प्रतिकात्मक फोटो

भंडारा जिल्ह्यात (27 एप्रिल 2020)रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर (05 जुलै 2020)पर्यंत कधी एक आकडी, तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या होती. जवळपास एक वर्षानंतर आज (1 जुलै 2021)रोजी कोरोना रुग्णसंख्या शून्य झाली आहे.

भंडारा - जिल्ह्यात मागील एक वर्षानंतर पहिल्यांदाच गुरुवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. गुरुवारी 526 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. एक वर्षानंतर पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्य आली आहे. भंडारा जिल्ह्यात (27 एप्रिल 2020)रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर (05 जुलै 2020)पर्यंत कधी एक आकडी, तर कधी शून्य अशी रुग्णसंख्या होती. (5 जुलै 2020)रोजी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या शून्य आली होती. त्यानंतर जिल्ह्यात रुग्ण वाढीचा आलेख चढताच राहला असून, जवळपास एक वर्षानंतर आज (1 जुलै 2021)रोजी कोरोना रुग्णसंख्या शून्य झाली आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.04 टक्के इतके आहे.

'रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98. 04 टक्के'

526 रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतरही एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. 5 जुलै 2020 नंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्ण आढळला नाही. तर 4 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58, 318 इतकी झाली आहे. आजपर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 59, 482 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98. 04 टक्के आहे. आतापर्यंत 4 लाख 16 हजार 690 व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात 59, 482 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. केवळ 36 रुग्ण घेत आहेत.

भंडारा जिल्ह्यात आता 59482 कोरोना बाधित

जिल्ह्यात 59482 इतकी कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामध्ये केवळ 36 रुग्ण सक्रिय आहेत. यामध्ये भंडारा तालुक्यात 6, मोहाडी तालुक्यात 3, तुमसर 5, पवनी 3, लाखनी 6, साकोली 8, आणि लाखांदूर तालुक्यात 5 सक्रिय रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1128 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98. 04 टक्के इतके आहे. तर, जिल्ह्याचा मृत्यूदर 01.90 टक्के एवढा आहे. मागील महिन्याभरात जिल्ह्यात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.

'धोका संपला नाही'

आज केलेल्या चाचण्यांमध्ये जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या शून्य आली आहे. ही दिलासादायक बाब आहे. असे असले तरी, कोरोनाचा धोका मात्र अजूनही संपला नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होत असताना, नागरिकांनी अधिक सावध रहाणे आवश्यक आहे. गाफीलपणा अजिबात परवडणार नाही. नागरिकांनी कोरोनाचे नियमही काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details