महाराष्ट्र

maharashtra

Bhandara Accident बस चालकाचे प्रसंगावधान; मोठा अपघात टळला

By

Published : Sep 4, 2022, 10:17 PM IST

मोठा अपघात टळला
मोठा अपघात टळला ()

Bhandara Accident जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग 6 वरील बेला या गावाजवळ तिहेरी अपघात झाले आहे. यामध्ये 2 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भंडारावरून नागपूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर GJ12T9866 चा एक चाक अचानक निघाल्याने तो अनियंत्रित झाला.

भंडारा जिल्ह्याच्या राष्ट्रीय महामार्ग 6 वरील बेला या गावाजवळ तिहेरी अपघात झाले आहे. यामध्ये 2 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भंडारावरून नागपूरच्या दिशेने जाणारा ट्रेलर GJ12T9866 चा एक चाक अचानक निघाल्याने तो अनियंत्रित झाला. त्याचवेळी नागपूर भंडाऱ्याच्या दिशेने जाणारा ट्रक Truck going towards Nagpur Bhandara क्रमांक WB29B6413 च्या चालकाने या अनियंत्रित ट्रेलर पासून स्वतःचा ट्रक वाचविण्याच्या प्रयत्ना स्वतःही अनियंत्रित झाला.

या दरम्यान ट्रेलरच्या मागे असलेली देवरी- नागपूर बस क्रमांक MH40Y5145 च्या चालकाला अनियंत्रित ट्रक आपल्या बसवर आदळेल असे लक्षात आले, तेव्हा समोरासमोर होणारा अपघात टाळण्यासाठी बस चालकाने त्याची समय सूचकता दाखवत बस रस्त्याच्या खाली उतरविली. तर ट्रक हा रस्त्याच्या मधोमध पलटला. बसवर नियंत्रण मिळवल्यानंतर गावकऱ्यांनी आणि रस्त्या लगत जाणाऱ्या लोकांनी बसमधून प्रवाशांना सुखरूप passengers safely evacuated बाहेर काढले आहे.

मोठा अपघात टळला

या अपघातात 3 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर National Highway मागील 2 तासापासून वाहतुकीची कोंडी झालेली आहे. घटनेनंतर वाहतूक नियंत्रक विभागाचे अधिकाऱ्यांनी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही पुढचे दोन ते तीन तास ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेळ लागेल असा अंदाज आहे.

हेही वाचाSharad Pawar on Cyrus Mistrys Death सायरस मिस्त्री यांचा अपघात धक्कादायक पद्धतीचा, हा अपघात काहीतरी शिकवतोय; शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details