महाराष्ट्र

maharashtra

बँक कर्मचारी निघाला 'एटीएम क्लोनिंग' प्रकरणाचा म्होरक्या

By

Published : Jan 6, 2021, 5:21 PM IST

Updated : Jan 6, 2021, 7:45 PM IST

एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन अनेकांच्या बँक खात्यातील पैसे लुबाडणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी एका राष्ट्रीय बँकेचा कर्मचारी असून त्याचा साथीदार पसार झाला आहे.

भंडारा पोलीस ठाणे
भंडारा पोलीस ठाणे

भंडारा - एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन त्याआधारे पैसे काढणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. हा मुख्य आरोपी एका राष्ट्रीय बँकेचा कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. त्याचा सहकारी अजूनही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईहून आरोपी रणधीरकुमार सिंह याला अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक
नागरिकांच्या खात्यातून व्यवहार न करता पैसे व्हायचे गायब

डिसेंबर महिन्यात भंडारा जिल्ह्याच्या नागरिकांच्या खात्यातून पैसे अचानक गायब होण्याच्या तक्रारी पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने पोलीस विभागाने तपास सुरू केले असता. भंडारा शहरातील एटीएममधून क्लोनिंग केलेल्या कार्डद्वारे पैसे काढले जात असल्याचे पुढे आले. या पद्धतीने 1 लाख 34 हजार रुपये परस्पर काढल्याची तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

सायबर सेलच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचणे शक्य

पोलिसांनी तक्रारीनंतर भंडारा शहरातील एटीएममध्ये तपासणी सुरू केली असता ज्या एटीएममधून पैसे काढले होते त्याचे फुटेज तपासले तेव्हा 3-4 तरुण एटीएम मशीनमध्ये छेडछाड करताना दिसले. पोलिसांनी लगेचच तापसाची सुत्रे फिरवली. त्यांच्या तपासात एटीएम क्लोनिंगचे कनेक्शन मुंबई व झारखंडमध्ये आढळून आले.

झारखंड येथून आरोपी फरार

आरोपी विषयी अंदाज येताच भंडारा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दोन पथके तयार करून मुंबई आणि झारखं च्या दिशेने रवाना केले. आरोपी रणधीर कुमार सिंहला मुंबईवरुन अटक करण्यात आली. मात्र, झारखंड येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. झारखंड येथील आरोपी फरार झाला असला तरी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून एटीएम क्लोनींंगचे साहित्य आणि काही एटीएम जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

या गुन्ह्याच्या प्रकारात राष्ट्रीय बँकेचा एक कर्मचारी असून त्याचे इतर सहकारी आहेत. यांची गुन्ह्याची नेमकी पद्धत कशी याविषयी पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे हे आरोपी एकापेक्षा अधिक असतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. येणाऱ्या काळात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -अखेर 5 दिवसानंतर आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह

हेही वाचा -शुल्क न भरणाऱ्या मुलांना खासगी शाळांनी परिक्षेपासून ठेवले वंचित

Last Updated :Jan 6, 2021, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details