महाराष्ट्र

maharashtra

Youth Suicide In Beed: स्वतःच्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस ठेवत घेतला गळफास

By

Published : Jul 9, 2023, 6:39 PM IST

बीड जिल्ह्यात दोन तरुणांनी वेगवेगळ्या कारणावरून आत्महत्या केल्याची घटना आज (रविवारी) उघडकीस आली. एकाने गळफास लावून तर दुसऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Youth Suicide In Beed
घेतला गळफास

बीड: जिल्ह्यातील आधापुरी घाट येथील एका वीस वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेवून गळफास घेतल्याची घटना आज (रविवारी) दुपारी घडली आहे. शुभम बाळासाहेब जगताप असे या तरुणाचे नाव आहे.

शेतीच्या वादातून आत्महत्या: गेली अनेक दिवसांपासून शुभम आणि पुतण्या यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून नेहमी वाद होत असत आणि हे वाद काही कमी व्हायला तयार नव्हते. त्यामुळे शुभमने आपल्या मोबाईलवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवत शेतामधील बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.


विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या:दुसरी घटना ही बीड तालुक्यातील उमरदखालसा या गावात घडली. काल सकाळपासूनच गणेश नारायण कोल्हे (18) हा तरुण घरातून निघून गेला होता. काल घरातील मंडळींनी सर्व नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली असता कुठेही तो आढळून आला नाही; मात्र आज गावाच्या जवळच असलेल्या तलावाच्या बाजूला विहिरीत तरुणाची चप्पल आढळून आली. त्यानंतर ही बाब लगेच पोलिसांना कळविण्यात आली. याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अशोक दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी नऊ वाजल्यापासून या विहिरीमध्ये त्याचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. शेवटी पाण्यामध्ये कॅमेरा सोडण्यात आला आणि पाच तासाच्या परिश्रमानंतर तरुणाचा मृतदेह दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.


आत्महत्या की घातपात?गणेश नारायण कोल्हे हा काही दिवसांपासून सतत चिडचिड करत होता. त्यामुळे त्याने आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. त्याच्या चेहऱ्यावर काही लागलेल्या खुणा आढळून आल्या आहेत. हा घातपाताचा संशय असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गणेश याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. याचा तपास पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारती हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details