महाराष्ट्र

maharashtra

ऑलिम्पिकसाठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

By

Published : Dec 29, 2020, 8:20 PM IST

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा रहिवासी असलेल्या अविनाश साबळे या खेळाडूला ऑलिम्पिकच्या पूर्व तयारीसाठी राज्य सरकारने 50 लाख रुपयांची मदत दिली आहे. राज्य सरकारने अविनाशसह राज्यातील अन्य 4 जणांना देखील अर्थसहाय्य केले आहे. अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे.

Avinash Sabel for Olympic preparations
अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

बीड - जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा रहिवासी अविनाश साबळे आता ऑलिम्पिकसाठी तयारी करतोय. त्याला राज्य सरकारने ऑलिंपिकच्या पूर्व तयारीसाठी 50 लाख रुपये अविनाशला दिले आहेत. अविनाशसह राज्यात इतर 4 जणांना देखील शासनाने मदत केली आहे.

मूळचा आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे. त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकलेली आहेत. मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पी.एम. मुनोत ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी 12 वी चे शिक्षण पूर्ण केले. या दोन वर्षात त्याने प्रा.जमीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्ड केलं. त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीमुळे आर्मीत प्रवेश केला. सध्या अविनाश अडथळयांच्या शर्यतीचा सराव करत आहे.

टोकियो येथे होणार्‍या 2021ऑलिम्पिक स्पर्धेत तो सहभागी होत आहे -


टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये असे 2.50 कोटीची रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर ( शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत ( शूटिंग), तेजस्विनी सावंत ( शूटिंग), प्रवीण जाधव ( आर्चरी रिकर्व्हर सांघिक), अविनाश साबळे ( एथलेटिक्स) या 5 खेळाडूंना हे सहाय्य देण्यात आले. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी कोटा मिळाला आहे.

अविनाश गोल्ड जिंकेल - पालकमंत्री धनंजय मुंडे

भूमिपुत्र अविनाश साबळे आमचा अभिमान आहे. त्याच्या लढ्यात सरकार काहीच कमी पडू देणार नाही. टोकियोमधील ऑलम्पिकमध्ये तो सुवर्ण जिंकून घेऊन आमचे स्वप्न पूर्ण करील, असा माझा विश्वास आहे. आष्टीच्या मातीने नेहमीच जिल्ह्याचे नाव देश व विदेशात गाजवले आहे. अविनाश तोच वारसा जपत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details