महाराष्ट्र

maharashtra

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का! वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला, नेमकं कारण काय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:00 AM IST

Pankaja Munde : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी युनियन बँक ऑफ इंडियानं वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया जाहीर केलीय. यामुळं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय.

Pankaja Munde
Pankaja Munde

बीड Pankaja Mundhe : माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्या मागचा वसुलीदारांचा ससेमिरा कमी होण्याचं नाव घेत नाही. अगोदरच जीएसटीच्या थकबाकीसाठी वैद्यनाथ कारखान्यावर आरआरसीची कारवाई सुरु असतानाच आता युनिअन बँकेनंही कारखान्याकडे तब्बल 203 कोटींच्या थकबाकीसाठी थेट कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केलीय. त्यासाठीची जाहिरात करण्यात आली आहे. 25 जानेवारी रोजी हा लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय.

पंकजा मुंडे कसा मार्ग काढणार : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 19 कोटी रुपयांच्या थकीत जीएसटी प्रकरकरणी या विभागानंही कारखान्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. याचे राजकीय पडसाददेखील उमटले होते. समर्थकांनी त्यांच्यासाठी मदत देऊ केली होती. मात्र, पैसे नको, आशिर्वाद द्या, असं म्हणत भाजपा नेत्या मुंडेंनी आर्थिक मदत नाकारली होती. त्याचकाळात बँकेनं कारखान्याकडे थकीत कर्जासाठी कारवाईसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडेदेखील प्रक्रिया सुरू केली होती. बँकेनं जप्तीच्या याचिका दाखल केल्या होत्या. मात्र सदरचं प्रकरण वेगळ्या न्यायिक खंडपीठासमोर सुरू झाल्याबद्दल सांगत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेची याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता बँकेनं थेट कारखान्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केलीय. केंद्र सरकारनं राष्ट्रीय सहकार विकास निगम लिमिटेड मार्फत राज्यातील विविध सहकारी साखर कारखान्यांना मार्जीन लोन दिलंय. यात काँग्रेस नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. मात्र, वैद्यनाथचा या कर्जासाठी प्रस्ताव असूनही (Loan) मिळालेलं नाही. याबाबत खुद्द पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता या संकटातून पंकजा मुंडे कसा मार्ग काढतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

कोणाच्या नावानं निघाली नोटीस : लिलावाच्या नोटीस मध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लि., आश्रबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिनगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडूरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपेट, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे पाटील, वेंकटराव कराड, यशश्री मुंडे यांचा लिलाव नोटीसीत कर्जदार, जामिनदार व तारणदार म्हणून उल्लेख करण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. Pankaja Munde News : दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लाचार नाही, दसरा मेळ्याव्यात पंकजा मुंडेंची गर्जना; नवीन पक्ष काढणार?
  2. Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...

ABOUT THE AUTHOR

...view details