महाराष्ट्र

maharashtra

एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला - पंकजा मुंडे

By

Published : Mar 11, 2021, 5:11 PM IST

Updated : Mar 11, 2021, 5:28 PM IST

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा येत्या १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत सरकारने ही परीक्षा अचानक रद्द केली. यापूर्वी देखील परीक्षा स्थगित करण्यात आली होती. सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडे

बीड -राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ट्विट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे

हेही वाचा -दिलासा ! रेमडेसिवीर इंजेक्शन लवकरच केवळ १५०० रुपयांत

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा येत्या १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत सरकारने ही परीक्षा अचानक रद्द केली. यापूर्वी देखील परीक्षा स्थगित करण्यात आली होती. सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. एमपीएससीचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत पुणे किंवा अन्य शहरात राहून करिअर घडवण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात. कोरोनाचे नियम पाळून इतर सर्व व्यवहार चालू आहेत, मग परीक्षा का नको? असा सवाल त्यांनी केला. परीक्षा रद्द केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे, त्यांची मेहनत व्यर्थ जाईल तसेच त्यांचे भविष्य देखील अंधकारमय होईल. सरकारच्या या निर्णयाने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यांना न्याय द्यावा, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूस 'या' लोकांना धरले जबाबदार; मुलाची पोलिसात तक्रार

Last Updated : Mar 11, 2021, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details