महाराष्ट्र

maharashtra

Monsoon Maharashtra update : मृग नक्षत्र गेले कोरडे; पेरणीसाठी बळीराजा मेघराज्याच्या प्रतिक्षेत

By

Published : Jun 22, 2023, 2:05 PM IST

Updated : Jun 22, 2023, 2:40 PM IST

बीड जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मृग नक्षेत्रामध्ये पेरणी झाली तर उत्पादनामध्ये वाढ होते. मात्र, या नक्षत्रामध्ये पेरणी न झाल्यास उत्पादनात घट ही त्याच प्रमाणामध्ये येते. मृग नक्षत्रामध्ये जर पेरणी झाली तर उत्पादन शंभर टक्के मिळते, जर मृग नक्षत्र टाळून पुढे गेले तर उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्के घट येते. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर परिणाम होतो. असे बीड जिल्ह्यातील शेतकरी म्हणत आहे, याबद्दल सविस्तर या रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Rain Update
मृग नक्षत्राचा पाऊस

बीड :बीड जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतीची मशागत झालेली नाही. एकूण 27 नक्षत्र आहेत. यामध्ये काही महत्त्वाची नक्षत्र आहेत. त्या नक्षत्रामुळे ऋतूवर व कालचक्रावर मोठ्या प्रमाणात वर त्याचा परिणाम होतो. अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फालगुनी, हस्त, चित्रा, स्वाती,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठ, मूला, पूर्वा वाढ, उत्तरावाढ, श्रावण, धनिष्ठा, पूर्व भाद्र, उत्तरभाद्र, रेवती ही नक्षत्र महत्त्वाची मानले जातात.





सध्या बिकट परिस्थिती : आमच्या लहानपणी भरपूर पाऊस पडत होता. पीक भरपूर यायचे. आता पाऊसही पडत नाही आणि पीकही चांगले येत नाही, असा अवघड प्रश्न होऊन बसला आहे. खत आणि बियाणाला आता खूप महागाई झाली आहे. मृग नक्षत्र निघून गेले. आता दोन दिवसांमध्ये आद्रा हे नक्षत्र निघणार आहे. पाऊस वेळेवर नाही पडला, तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार? सध्या बिकट परिस्थिती झाली आहे. काही दिवसांनी पाणी प्यायला मुश्किल होईल. पाऊस नसल्यामुळे सर्व शेतकरी हवालदार झाले आहेत, अशी प्रतिक्रिया शेषेराव लेटे नावाच्या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.




माल विकायचा अधिकार : मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला तर तूर ,कापूस ,उडीद, मूग, सोयाबीन, तीळ ,कारळ ही पीक घेता येतात. या पिकांतून शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतात. शेतकऱ्यांना पीक उभे करायला जास्त खर्च येतो, त्या प्रमाणत उत्पन्न कमी मिळते. सरकार म्हणते की, आम्ही अनुदान देतो पण आमचा खर्च चारपट होतो. नुकसान भरपाई आणि अनुदान देत सरकार तुटपुंजी रक्कम देते. आमचा माल विकायचा अधिकार आम्हाला द्यावा. सरकारने आणि व्यापाऱ्याने सुद्धा आमचा माल आम्ही म्हणेल त्या किमतीत घ्यावा, ही आमची सरकारकडे मागणी आहे, अशी प्रतिक्रिया गोरख मसु गवते नावाच्या शेतकऱ्याने व्यक्त केली.

शेतकरी अडचणीत : मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडत असतो. मात्र, यावर्षी कुठलाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आमच्या पेरण्या झालेल्या नाही. यामुळे आम्ही शेतकरी अडचणीत आलो आहोत. खत बियाणे घरांमध्ये घेऊन ठेवले आहे. मात्र हे कोरड्यामध्ये पेरायचे कसे? हा सुद्धा प्रश्न आमच्या पुढे आहे. घरामध्ये खत बियाणे आणून ठेवलेले आहे. जून महिना सरला तरी पाऊस आलेला नाही. विशेष म्हणजे मागील पिकाला योग्य भाव न मिळाल्यामुळे आम्ही अडचणीत आहोत. ज्या पद्धतीने व्यापारी आमच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार त्यांना आहे, तसाच अधिकार आम्हालाही द्यावा ही आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे, असे शेतकरी सुधाकर बबन लाटे म्हणाले.

हेही वाचा :

  1. Kolhapur News : शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे; जिल्ह्यात भाताची 10 टक्के पेरणी पूर्ण
  2. Compensation To Farmers: शेतपिकांच्या नुकसानीकरता १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,५०० कोटी नुकसान भरपाई; तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार?
  3. Maharashtra Weather Update: बळीराजाला मोठा दिलासा; 'या' तारखेपासून मेघगर्जनेसह मान्सून धडकणार- हवामान खात्याचा अंदाज
Last Updated :Jun 22, 2023, 2:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details