महाराष्ट्र

maharashtra

बीडमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By

Published : May 7, 2021, 5:54 PM IST

Updated : May 7, 2021, 7:07 PM IST

कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. यावेळी कोणतेही नियम न पाळल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वारंवार जनतेला आवाहन करत आहे. तर दुसरीकडे मात्र त्यांचेच मंत्री कार्यकर्ते सार्वजनिक कार्यक्रम घेऊन नियमांना हरताळ फासत आहेत.

उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बीड - बीड जिल्हा हा कोरोनाबाधित रुग्णांचा हॉटस्पॉट बनत आहे. मागील महिनाभरापासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. वाढत्या रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत शुक्रवारी (आज) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कोविड सेंटर उद्घाटन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. सार्वजनिक राजकीय कार्यक्रमास बंदी असताना भव्य कार्यक्रम घेण्यात आला. कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. यावेळी कोणतेही नियम न पाळल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः वारंवार जनतेला आवाहन करत आहे. तर दुसरीकडे मात्र त्यांचेच मंत्री कार्यकर्ते सार्वजनिक कार्यक्रम घेऊन नियमांना हरताळ फासत आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये 500 बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम पार पडले, याच कार्यक्रमात हजारपेक्षा अधिक नागरिक एकत्र आल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाल्याचे पहायला मिळाले. विशेष म्हणजे कार्यक्रमादरम्यान काही नागरिक विना मास्क देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मागील तीन दिवसात पोलिसांनी रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली होती. आता दस्तुरखुद्द शिवसेनेच्या मंत्र्यांनीच गर्दी जमवली आहे. याबाबत आता पुढील कारवाई पोलीस करणार का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा -लॉकडाऊनच्या धसक्याने सोलापुरात खरेदीसाठी तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Last Updated :May 7, 2021, 7:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details