महाराष्ट्र

maharashtra

भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरूवात; पंकजा मुंडेंनी दाखविला हिरवा झेंडा

By

Published : Aug 16, 2021, 5:50 PM IST

Updated : Aug 16, 2021, 6:05 PM IST

जनआशीर्वाद यात्रा
जनआशीर्वाद यात्रा ()

भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला फाटा देत भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ असलेल्या 'गोपीनाथ गड' याठिकानावरून सुरुवात झाली.

बीड -केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आज (सोमवारी) बीड जिल्ह्याच्या परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू झाली. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. ही यात्रा बीड जिल्ह्यात येणार नसल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेला फाटा देत भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळ असलेल्या 'गोपीनाथ गड' याठिकानावरून सुरुवात झाली.

जनआशीर्वाद यात्रेला गोपीनाथ गडावरुन सुरूवात
या यात्रेला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. तर खासदार प्रीतम मुंडे सुद्धा या प्रसंगी उपस्थित होत्या. या दरम्यान काही कार्यकर्ते नाराज असल्याचे समोर आले. या नाराज कार्यकर्त्यांशी खुद्द पंकजा मुंडे यांनी रागावल्याचे दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या निवास्थानापासून ते गोपीनाथ गडापर्यंत ही काही कार्यकर्त्यांची घोषणा बाजी सुरू होती.
Last Updated :Aug 16, 2021, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details