महाराष्ट्र

maharashtra

Beed News : केज तालुक्यात विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, विज पडून दोन म्हैस तर दोन शेळ्या दगावल्या...

By

Published : Apr 28, 2023, 3:20 PM IST

शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर अचानक वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना केळगाव ( ता. केज ) येथे काही वेळापूर्वी घडली आहे. काही ठिकाणी आजही काही प्रमाणात गारपीटीने झोडपले आहे.

Beed News
केज तालुक्यात विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

बीड : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात दोन मुलांचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर अवकाळीचे काळेकुट्ट ढग घोंगावत आहेत. यापूर्वीही गारपीट व वीज कोसळून शेतीची आणि जीवितहानी झाली आहे. आज सकाळपासूनच केज तालुक्यातील काही भागात ढग दाटून आले. पाऊसही झाला. मस्साजोग भागात जोरदार गारपीट झाली आहे. तसेच केज तालुक्यातील केळगाव येथे वीज कोसळल्याने शेतकरी बिभीषण आण्णासाहेब घुले या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यात वीज कोसळून जीवितहानीच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.

यावर काही तोडगा निघेल का? : वीज कोसळून मृत्यूच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसत असून, याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. कधी जनावरांचा बळी तर कधी शेतकऱ्यांचा बळी हा अवकाळी पाऊस व विज घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने पुर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. वीज कधी पडणार याची माहिती देणारे दामिनी हे मोबाईल ॲप डाऊनलोड करण्याचे मागे सांगितले जात होते. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात वीज रोधक यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्याला हैराण केले :त्याचबरोबर आंबेजोगाई तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्याला हैराण केले आहे. विज पडून चार जनावरे दगावले असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडून दोन म्हशी आणि दोन शेळ्या दगावल्या आहेत, तर एका ठिकाणी वीज कोसळून घराचे नुकसान झाले आहे. आंबेजोगाई तालुक्यात वाघाळा येथील अनंत वामनराव भगत, यांची एक म्हैस तर लहू चाटे खापरटोन यांची एक म्हैस, तळेगाव घाट येथे रमेश अंबादास यादव यांच्या घरावर वीज पडल्याने घराचे नुकसान झाले आहे तर, डोंगर पिंपळा येथील बंडू दादाराव शेफ यांच्या दोन शेळ्या वीज पडून मरण पावले आहेत.

हेही वाचा :Jiah Khan Death Case : जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

ABOUT THE AUTHOR

...view details