महाराष्ट्र

maharashtra

बीड : जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला भेट; रुग्णाशी साधला संवाद

By

Published : Jun 16, 2021, 5:09 PM IST

परळी उपजिल्हा रुग्णालयाने कोविड-19 संदर्भात उत्तम काम केले आहे. एकही कोविडने मृत्यू झाला नाही. जवळपास 191 कोरोनाग्रस्तावर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज केले आहेत, असे सांगत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे व सर्व डॉक्टर स्टाफ यांची प्रसंशा केली.

बीड डॉक्टर
बीड डॉक्टर

परळी (बीड) - जिल्ह्याचा नव्याने जिल्हा शल्यचिकिसक म्हणून पदभार स्विकारलेल्या डॉ. सुरेश साबळे यांनी रात्री परळी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीत उपजिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापणाबाबत समाधान व्यक्त करत नव्याने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. डॉ. साबळे पत्रकारांशी बोलताना सांगितले, की परळी उपजिल्हा रुग्णालयाने कोविड-19 संदर्भात उत्तम काम केले आहे. एकही कोविडने मृत्यू झाला नाही. जवळपास 191 कोरोनाग्रस्तावर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज केले आहेत, असे सांगत त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे व सर्व डॉक्टर स्टाफ यांची प्रसंशा केली. तर येणाऱ्या काळात सर्व प्रकारचे छोट्या मोठ्या सर्जरी, नॉन कोविड रुग्णांसाठीची अधिका अधिक ओपीडी करुन उपचार करण्यात यावेत. उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण किंवा नातेवाईक यांची तपासणी करुन घ्यावे, अशा सूचनाही यावेळी डॉ. साबळे यांनी दिल्या आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली उपजिल्हा रुग्णालयाला भेट
दरम्यान यावेळी डॉ. साबळे यांनी संपुर्ण दवाखाण्याची पाहणी केली. उपचारार्थी असलेल्या रुग्णांची चौकशी करुन तपासणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख, डॉ. वैभव डुबे, डॉ. संजय गित्ते, डॉ. व्यंकटेश तिडके, डॉ. राजश्री गित्ते, डॉ. वैशाली गंजेवार, आदी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय नर्सिग स्टाफ उपस्थित होता.

ABOUT THE AUTHOR

...view details