महाराष्ट्र

maharashtra

परळीत रस्त्यावर खड्डे की खड्यात रस्ते?; भाजपचा प्रशासनाला इशारा

By

Published : Jun 6, 2021, 9:04 PM IST

'परळी शहरात रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यात रस्ते, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे प्रशासनाने येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम नाही केले, तर महिला शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल', असा इशारा भाजपाचे युवक कार्यकर्ते गोविंद चौरे यांनी दिला आहे.

बीड परळी
beed

परळी वैजनाथ (बीड) - 'परळी शहराची सध्याची स्तिथी "तोंड दाबून बुक्यांचा मार" अशी झाली आहे. ते शहरातील नागरिक सहनही करत आहेत. मात्र नागरिकांचे हे हाल त्वरीत थांबवावे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल', असा इशारा भाजपाचे युवक कार्यकर्ते गोविंद चौरे यांनी दिला आहे. शहरातकुठेही जा, कोणत्याही गल्लीत जा. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्यात रस्ते, हे कळायला मार्ग नाही. पहिल्याच पावसात नागरिकांचे इतके हाल झाले आहेत की, नागरिकांना पाऊस नको वाटायला लागला आहे. त्यातच सिद्धार्थ नगर येथे रस्ते तर नाहीतच. पण गल्ली शेजारील खाडी नाला ड्रेनेजच्या नावाखाली अडवून ठेवला आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या बोअरला खाडी नाल्याचे घाण पाणी येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

भाजपाचे युवक कार्यकर्ते गोविंद चौरे

'नागरिकांची दिशाभूल थांबवा'

'मागील 3 महिन्यांपासून सिद्धार्थ नगरचे रस्ते अर्धवट खोदून ठेवले आहेत. तर ड्रेनेजच्या कामाच्या नावाखाली खाडी नाल्याचे पाणी अडवून ठेवले आहे. त्यामुळे येथील सर्व बोअरला घाण पाणी येत आहे. या संदर्भात परळी पालिकेचे मुख्याधिकारी यांना अनेक वेळा फोन करून माहिती दिली आहे. मेसेजही पाठवले. तरी ते फक्त आश्वासन देत आहेत. काम करणे होत नसेल किंवा ठेकेदार तुमचे ऐकत नसतील तर कमीत कमी नागरिकांची दिशाभूल तरी करू नका', असे गोविंद चौरे यांनी म्हटले आहे.

मुख्याधिकाऱ्यांना आव्हान

'अर्धवट खोदून ठेवलेल्या कामामुळे व झालेल्या पावसामुळे सिद्धार्थ नगरचा रस्ता खराब झाला आहे. त्यावर चालण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्याधिकारी साहेब आपण येऊन या रस्त्यावर चालून दाखवा. आम्ही तुम्हाला बक्षीस देऊ', असे आव्हानच चौरे यांनी दिले आहे.

प्रशासनाला इशारा

'येत्या 8 दिवसांत रस्त्याचे काम नाही केले, तर महिला शिष्टमंडळ घेऊन मुख्याधिकारी यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल', असा इशारा भाजपाचे युवक कार्यकर्ते गोविंद चौरे यांनी दिला आहे.

हेही वाचा -भगवा झेंडा लावणं ही महाराष्ट्राची शान- संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details