महाराष्ट्र

maharashtra

Beed Accident News: बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत दुचाकी घुसल्याने अपघात; अपघातात तीन महिला जखमी

By

Published : Jun 19, 2023, 11:47 AM IST

बीडच्या उदंड वडगाव येथे मुक्ताईची पालखी आल्यानंतर पालखी विश्रांतीसाठी वारकरी थांबले होते. पालखीमध्ये असलेल्या महिलांना दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यामुळे तीन महिला जखमी झालेल्या आहेत.

Accident News
बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत अपघात

बीडमध्ये मुक्ताईच्या पालखीत अपघात

बीड :आषाढी वारीनिमित्त अनेक भक्तगण विठ्ठलाच्या भेटीसाठी पाई वारी करत आहेत. दोन दिवसापूर्वीच बीड वरून मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. उदंड वडगाव येथे मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना एका दुचाकी चालकाने धडक दिली. त्यामुळे तीन महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील दुचाकीस्वाराने पळ काढला :या महिलांना कुणाला पायाला तर कुणाला हाताला जखम झालेली आहे. जखमींमध्ये सावित्री सुभाष शेळके, सरुबाई सोनू कोड़े, पुरणाबाई पवार या महिलांचा समावेश आहे. या आपल्या गावावरून मुक्ताईच्या पालखीमध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. अचानक झालेल्या या अपघाताने त्यांची वारी अपूर्ण राहते की काय? असा प्रश्न यांनी उपस्थित होत आहे. मात्र या अपघातातील दुचाकी स्वाराने या ठिकाणाहून पळ काढला आहे.

जखमी महिलांवर उपचार सुरू :जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर या जखमी महिलांना जिल्हा चिकित्सक सुरेश साबळे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना मदत केली आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयामध्ये तीन महिला रुग्ण आलेले आहेत. त्यांच्यावर आम्ही उपचार चालू केलेले आहेत. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या डॉक्टरांकडून या ठिकाणी आलेल्या रुग्णांवर उपचार चालू आहेत. यामध्ये कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांचे सिटीस्कॅन व इतर तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या चांगली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी दिली.


सर्वच गावकऱ्यांची मदत : जखमी महिलांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी आणलेले आहे. सध्या या महिलांची प्रकृती ठीक असून याच्यासाठी सर्वच गावकऱ्यांनी या महिलांना रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली. त्याचबरोबर आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते या कार्यामध्ये सहभागी झालो आहोत. या महिलांना सुखरूप व चांगल्या स्थितीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विनोद चव्हाण यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Canada Accident: कॅनडामध्ये जेष्ठ नागरिकांना घेवून जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या धडकेत 15 ठार, 10 जखमी
  2. Local Derail In Thane: लोकल ट्रेनचा डब्बा रुळावरून घसरला; कल्याण ते कर्जत मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत
  3. US Gun Violence: अमेरिकेतील हिंसाचारात वाढ, एकाच आठवड्यात गोळीबारात 6 ठार तर अनेक नागरिक जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details