महाराष्ट्र

maharashtra

लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

By

Published : Jun 24, 2021, 9:44 AM IST

उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाला कळालेल्या माहीतीनुसार एकून नऊ हजार रुपये मागणी करण्यात आली होती. नंतर सहा हजार रुपयांवर तडजोड होऊन नदीम मोसिन पठाण मार्फत सहा हजार रुपये गावातील सोनपेठ चौकात घेताना रंगेहात पकडले. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. दरम्यान बीड लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या पथकाकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात
दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एक व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात

परळी वैजनाथ(बीड) - जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका व्यक्तीस, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. सिरसाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध राखेचे हायवा टिपर चालू करुन देण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच घेताना हे दोन कर्मचारी आढळले. बुधवारी सिरसाळा सोनपेठ चौकात ही कारवाई करण्यात आली. असून लाच मागणाऱ्या पोलीस शिपाई उमेश यशवंत कणकावार (वय 31) व गजानन अशोक येरडलावर (वय 32) याशिवाय नदीम मोसिन पठाण (वय 26) रा.सिरसाळा अशी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत विभागाची कारवाई
उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाला कळालेल्या माहीतीनुसार एकून नऊ हजार रुपये मागणी करण्यात आली होती. नंतर सहा हजार रुपयांवर तडजोड होऊन नदीम मोसिन पठाण मार्फत सहा हजार रुपये गावातील सोनपेठ चौकात घेताना रंगेहाथ पकडले. उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी गौरीशंकर पाबळे, पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके अर्जुन मारकड चालक दत्तात्रय करडे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान बीड लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या पथकाकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लाच स्वीकारताना दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
राख नेहमीच वादग्रस्त
बीड जिल्ह्यातील परळी येथे असलेल्या एकमेव असलेल्या वीजनिर्मीती केंद्रातील राखेचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असतो. थर्मलच्या चिमणीमधून उडालेली राख लोकांच्या घरावर आणि अंगावर पडत असते, यामुळे परळी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर अनेकदा आंदोलने झाली. निवेदने दिली, राखेचा बंदोबस्त करण्याची मागणी केली गेली, परंतू उडणारी राख थांबली नाही. तर राखेची वाहतूक हा परळी थर्मलमधील मोठा आर्थिक व्यवसाय समोर येत गेला. राखेच्या धंद्यातून केवळ राख वाहतूक करणाऱ्यांचेच भले झाले नाही, तर त्यांना मदत करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांचे देखील कल्याण झाल्याच्या चर्चा वारंवार होतात. परंतू राखेची वाहतूक करणारी वाहने देवून घेवून हा व्यवसाय करत होते. परंतू बुधवारी त्याच राखेमध्ये पोलीस प्रशासनातील दोघे पकडले गेल्यानंतर लोक आता धागेदोरे जुळवू लागले आहेत.

हेही वाचा- लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांवर गुन्हा दाखल; लाचलुचपत विभागाची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details