महाराष्ट्र

maharashtra

Couple Burn Himself : स्वत: जाळून घेत प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी; प्रियकर 85 तर, प्रेयशी 50 टक्के भाजली

By

Published : Nov 21, 2022, 4:05 PM IST

Updated : Nov 21, 2022, 8:29 PM IST

तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःलाही जाळून घेतल्याचा ( Young couple Burn Himself ) धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला. शहरातील शासकीय विज्ञान संस्थेमध्ये ( Government Institute of Science, Aurangabad ) पी.एचडी करणाऱ्या तरुणाने स्वतःला जाळून घेत, प्रेयशीला मिठी मारली. यात मुलगा 85 टक्के तर मुलगी 50 टक्के भाजली आहे, दोघांवरही घाटी रुग्णालयात ( Gov Hospital Aurangabad ) उपचार सुरुय.

स्वत: जाळून घेत प्रियकराने मारली प्रेयशीला मिठी
स्वत: जाळून घेत प्रियकराने मारली प्रेयशीला मिठी

औरंगाबाद - तरुणाने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःलाही जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये घडला. शहरातील शासकीय विज्ञान संस्थेमध्ये पी.एचडी करणाऱ्या तरुणाने स्वतःला जाळून घेतलं आणि प्रियशीला मिठी मारली. यात मुलगा 85 टक्के तर मुलगी 50 टक्के जळाली आहे, दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्वत: जाळून घेत प्रियकराने मारली प्रेयशीला मिठी

दोघेही करत आहेत पी.एचडी - औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून दोघेही पीएचडीचा अभ्यास करत होते. तिची झूलॉजी प्रोजेक्टची तयारी सुरू होती. त्यासाठी प्रोजेक्टवर काम करत होती. युवती फॉरेन्सिक विभागात प्रोजेक्ट करत होती. त्यावेळी गजानन मुंडे आला. केबिनचा दरवाजा त्याने लावला. त्याच्याकडे पेट्रोलच्या दोन बाटल्या होत्या.

मुलगा जवळपास 85% तर मुलगी 50% टक्के भाजली - त्यातील एक त्याने स्वतःच्या अंगावर टाकून घेतली तर दुसरी मुलीच्या अंगावर टाकली. प्राचार्यांना शंका येताच त्यांनी मुलाला पळ अस सांगितल. मात्र त्याने तिला मिठी मारली. स्वतः ला पेटवून घेतले. यात तरुण, तरुनी दोघेही भाजले. दोघांनाही तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मुलगा जवळपास 85% तर मुलगी 50% टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती बेगमपुरा पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

दोघांचे होते प्रेमसंबंध -मिळालेल्या माहिती नुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागात दोघांचा परिचय झाला. गजाजनची पीएचडी सुरु आहे. अनेक दिवसांपासून दोघांत प्रेम संबंध होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच ही घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. पूजाने माझा वापर केला, आता ती माझ्याशी लग्न करत नाही.

वापर केल्याचा प्रियकराचा आरोप - तिने माझा वापर केला असा आरोप गजानन याने केला आहे. यातूनच तो महाविद्यालयात गेला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूजाने पोलीस स्टेशनमध्ये गजानन आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार दिली असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पुढील तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Last Updated : Nov 21, 2022, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details