महाराष्ट्र

maharashtra

Terrorists Nanded Connection : दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी नांदेडचे पोलीस हरियाणाला रवाना

By

Published : May 6, 2022, 12:00 PM IST

हरियाणातील कर्नाल येथे पाकिस्तानातील चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आले ( Terrorists Arrested In Karnal ) होते. या दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन ( Terrorists Nanded Connection ) तपासण्यासाठी नांदेडचे पोलीस हरियाणाला रवाना झाले ( Nanded police to investigate terrorists ) आहेत.

Terrorists Nanded Connection
दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी नांदेडचे पोलीस हरियाणाला रवाना

औरंगाबाद : हरियाणातील कर्नाल येथे चार संशयित पाकिस्तानशी संबंधित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्यानंतर ( Terrorists Arrested In Karnal ) त्यांच्या वाहनातून शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी जप्त करण्यात आला होता. या दहशतवाद्यांच्या चौकशीसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक हरियाणाला रवाना करण्यात आले ( Nanded police to investigate terrorists ) आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे नांदेड कनेक्शन ( Terrorists Nanded Connection ) उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे की, पाकिस्तानशी संबंधित चार संशयित दहशतवाद्यांना गुरुवारी सकाळी कर्नालमध्ये पकडल्यानंतर ते स्फोटके वितरीत करण्यासाठी तेलंगणाला जात असताना त्यांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला. कर्नालचे पोलिस अधीक्षक, गंगा राम पुनिया यांनी गुरुवारी पत्रकारांना सांगितले की हे चार संशयित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानस्थित व्यक्तीच्या संपर्कात होते आणि ते स्फोटके आणि शस्त्रे वितरीत करण्यासाठी त्यांना अॅपद्वारे ठिकाणे पाठवत होते. ते नांदेडजवळील एका ठिकाणी जात असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

पीटीआयशी बोलताना नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले, "नांदेड पोलिसांनी हरियाणातील कर्नाल येथे एक पथक पाठवले आहे. ते उत्तरेकडील राज्यात जात आहे. हे पथक चार दहशतवादी संशयितांची चौकशी करेल आणि त्यानंतर पुढील मार्ग ठरवेल." चारही संशयित पंजाबचे रहिवासी आहेत, हरियाणा पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, प्रत्येकी 2.5 किलो वजनाचे तीन कंटेनर आरडीएक्स, एक पाकिस्तानी पिस्तूल आणि 31 जिवंत काडतुसे याशिवाय त्यांच्या वाहनातून रोख 1.3 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

हेही वाचा : हरियाणात अटक केलेल्या दहशतवाद्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी; नांदेडमधील घातपाताचा उधळला डाव

ABOUT THE AUTHOR

...view details