महाराष्ट्र

maharashtra

कन्नड तालुक्यातील जैतखेड्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

By

Published : Sep 11, 2020, 11:17 AM IST

भिवसन विश्राम नलावडे यांच्या शेतात हा बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनिवभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामान केला. विजेचा धक्का लागून या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जैतखेड्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या
जैतखेड्यात मृतावस्थेत आढळला बिबट्या

कन्नड-(औरंगाबाद)-कन्नड तालुक्यातील मौजे जैतखेडा शिवारात शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. भिवसन विश्राम नलावडे यांच्या शेतात हा बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती मिळताच वनिवभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामान केला. विजेचा धक्का लागून या बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

जैतखेडा येथे बिबट्याचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच, वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी (चमू) घटनास्थळी दाखल झाले. मृत मादी बिबट्याचे सर्व अवयव शाबूत होते. विजेचा धक्का (शॉक) लागून मादी बिबट्या चा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमू ने कळविले आहे.

यावेळी वनपरिमंडळ अधिकारी एस.पी.कादी, प्रवीण कोळी, जि. एन. घुगे यांच्यासह क्षेत्रीय वनरक्षक राम जाधव, सचिन काकुळते, एम. ए.शेख हजर होते. या प्रकरणी अरुण पाटील उपवनसंरक्षक (अतिरिक्त कार्यभार) औरंगाबाद, सचिन शिंदे , सहाय्यक वनसंरक्षक कन्नड (रोहयो व कॅम्पा) यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यू. ए. सय्यद वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड (प्रा.) हे पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details