महाराष्ट्र

maharashtra

Imtiaz Jalil on Thackeray VS Shinde : तुम्ही भांडा आम्ही तमाशा पाहतोय, ठाकरे-शिंदे गटाच्या भांडणावर इम्तियाज जलील यांचा निशाणा

By

Published : Feb 22, 2023, 6:58 AM IST

ठाकरे - शिंदे गटातील भांडणावर तुम्ही भांडा आम्ही तमाशा पाहतोय अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केलीये. यांच्यात सुरू असलेल्या भांडणामुळे आमच्याकडे कोणाचे लक्ष नाही. तुमच्यातील भांडणात तुम्ही व्यस्त आहात. जेवढं भांडायचे तेवढे भांडा आम्ही तमाशा पाहतोय अशा शब्दात एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली.

Imtiaz Jalil on Thackeray VS Shinde
तुम्ही भांडा आम्ही तमाशा पाहतोय

तुम्ही भांडा आम्ही तमाशा पाहतोय

औरंगाबाद :एमआयएम पक्ष वाढवण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. आमच्या एमआयएम पक्षाकडे युवक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे आमच्याकडे झालेल्या प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतात. भाजप सरखे आम्ही पैसे देऊन प्रसिद्धी मिळवत नाही. आमचा सोशल मीडिया सर्वात भक्कम आहे, तोही कोणतेही पैसे न देता फुकट काम करतो अशी टीका इम्तियाज जलील यांनी भाजपवर केली.



एनिमी जमिनीबाबत अधिवेशनात आवाज उचलणार : औरंगाबादच्या कटकट भागातील 22 एकर जागा एनिमी जमीन म्हणजे शत्रू जमीन असल्याची नोटीस केंद्र सरकारच्यावतीने बजावण्यात आली. 2018 मध्ये या नोटीस बजावण्याचे काम सुरू झाले. मात्र इतके दिवस सरकार झोपली होती का? असा संतप्त प्रश्न खासदार इम्तियाज दिलेली यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना भेटणार असून अधिवेशनात देखील हा मुद्दा आम्ही मांडणार असल्याचा त्यांनी सांगितलं. त्याशिवाय ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. ठाकरे आणि शिंदे गट यांच्या वादामुळे आमच्यावर कोणही टीका करत नाही. त्यामुळे त्यांनी भांडावं आम्ही तमाशा पाहत आहोत असे, खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

मोदींवर टीकास्त्र : इतकी वर्ष झाली लोक तिथे राहतात, त्यांना सुविधा दिल्या जातात, त्याच्या बदल्यात ते कर देखील भरतात. त्यांच्या नावावर त्यांची घर देखील आहेत. मात्र आता अचानक हे झोपेतून उठले का? मोदी म्हणतात की आम्ही बेघरांना घर देऊ, मग आता यांना त्यांच्या घरातून कसे काढता? याबाबत आता जनता आवाज उठवेल आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.


दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन : एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई येथे होणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन दिवसात हे अधिवेशन होणार आहे. पहिल्या दिवशी सर्व राज्यातील अध्यक्ष, आमदार, खासदार पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि अकबर ओवेसी यांची ही बैठक होईल. प्रत्येक राज्यात पक्षाची काय स्थिती आहे? याबाबत लेखाजोखा मांडला जाईल. इतकेच नाही तर काय अडचणी असू शकतात? यावर चर्चा देखील होणार आहे.

धारावीमध्ये बैठक होणार :दुसऱ्या दिवशी धारावीमध्ये हॉलमध्ये बैठक होणार आहे. निवडक पदाधिकारी आणि निवडून आलेले नगरसेवक या बैठकीला उपस्थित असतील. येणाऱ्याला ओळखपत्र देण्यात येईल, त्यांनाच प्रवेश असेल, मर्यादित जागा असल्याने सर्वांनाच तिथे निमंत्रित करता येणार नाही आणि या बैठकीत आम्ही महत्त्वाचे ठराव घेऊ. त्यानंतर रात्री जलसा होईल अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

हेही वाचा :Sushma Andhare : फडणवीसांची राऊतांवर टीका; सुषमा अंधारे म्हणाल्या, ते विद्वान व्यक्ती...

ABOUT THE AUTHOR

...view details