महाराष्ट्र

maharashtra

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात साचले पाणी, कांद्यासह डाळिंबाच्या बागेचे नुकसान

By

Published : Jun 17, 2021, 9:16 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पावसाचे पाणी भांबर्डा, जयपूर गावांतील शेतात शिरले आहे. या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने, डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात पीकांचे नुकसान झाले आहे.

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात साचले पाणी, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतात साचले पाणी, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

औरंगाबाद (करमाड) - जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाला आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या गावातील शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे गतिमान प्रवास करणाऱ्यांचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

कांदा आणि डाळिंबाचे झाले नुकसान

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पावसाचे पाणी भांबर्डा, जयपूर गावांतील शेतात पाणी शिरले आहे. या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने, डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भांबर्डा, जयपूर गावात शिरले आहे. यामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथे काढून ठेवलेला कांदा शेतात साठवणूक करण्यात आला होता. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने, हा साठवलेला कांदा ओला झाला आहे. तसेच, डाळिंबाची झाडं कोसळली आहेत. यामध्ये सुमारे 70 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

'नुकसानग्रस्त पाहणी पाण्याचे निर्देश'

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला दिल्या आहेत. पार्श्वभूमीवर भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाच्या कामामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई रामराव शेळके, महसूल विभागाचे तहसीलदार ज्योती पवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, मेघा व्यवस्थापक अधिकारी सत्यनारायण, मेघा कंपनीचे समन्वयक ज्ञानेश्वर कुबेर, इंजिनियर राजु, हायवे इंजिनियर कार्तिक यांनी पहाणी केली आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते. यापुढील अशा घटना रोखण्यासाठी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, त्यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सूचना समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, मेघा व्यवस्थापक अधिकारी सत्यनारायण यांनी संबधितांना दिल्या आहेत.

'गावकऱ्यांना हवा सर्व्हिस रस्ता'

येथील गावकऱ्यांनी सव्हिस रस्ता शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निवेदन समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग यांना दिले होते. पूर्वीच्या रस्त्यांचे काम समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बंद करून त्याजागी महामार्ग तयार झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांची जमीन दोन्ही बाजूला असल्याने त्याना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आम्हाला रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग यांनी शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या हद्दीतील जागेवर शेतात जाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत रस्ता केला जाईल, असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे. यावेळी सरपंच भीमराव पठाडे, बळीराम काळे, सुखदेव पठाडे, दौलत पठाडे, भीमराव साळुंके, अंबादास पठाडे, सोमिनाथ जाधव, भाऊसाहेब पठाडे, संतोष दिवटे, भिका नजन, सुनील काळे यांच्यासह शेतकरी उपस्थिती होते.

ABOUT THE AUTHOR

...view details