महाराष्ट्र

maharashtra

Sambhajinagar Crime : संभाजीनगरमध्ये लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ: पोलिसांच्या उपाययोजना फेल?

By

Published : Jul 19, 2023, 9:41 PM IST

Updated : Jul 19, 2023, 10:38 PM IST

छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्ह्यांमध्ये वाढ होताना आकडेवारीवरुन दिसून येत आहे. यातच लुटमारीच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. मागील सहा महिन्यांमध्ये लुटमारीच्या 131 घटना घडल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अशा घटनांना आळा बसवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची विनंती नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) -लुटमारींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मध्यरात्री पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी परिसरात भरदिवसा चाकूचा धाक दाखवून खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी रात्री अकरानंतर सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असताना, मागील सहा महिन्यांमध्ये लुटमारीच्या 131 घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा नेमके करती काय असा प्रश्न सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे.

रेकॉर्डवरील गुन्ह्यांचा तपास सुरु आहे. मोठ्या घटनांवर नियंत्रण आहे. मात्र, छोट्या घटनांवर आम्ही लवकरच नियंत्रण मिळवू - मनोज लोहिया, पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रकार - बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिकलठाणा हद्दीत एलपीजी पंपावर एकाने चाकूचा धाक दाखवून कामावर असलेल्या कर्मचाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ग्राहक नसल्याने पंपावरील कर्मचारी खुर्चीवर बसून आराम करत होता, त्यावेळी दुचाकीवर दोन जण पंपावर दाखल झाले. त्यातील एकाने चाकू काढून कर्मचाऱ्याला धमकवण्यास सुरुवात केली. इतकच नाही तर तो पैसे देत नसल्याचे पाहून आरोपीने मारहाण देखील केली. चाकूने वार करत असताना कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अडवले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र, यात कर्मचारी जबर जखमी झाला आहे. त्याच अवस्थेत त्याने प्रतिकार करत आरोपीला दूर लोटले आणि पंपावरील इतर कर्मचाऱ्यांना बोलावले. त्याचवेळी आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, याप्रकरणी चिकलठाणा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुकुंदवाडी भागात खंडणीसाठी धमकी - दोन दिवसांपूर्वी मुकुंदवाडी भागात भरदिवसा मेडिकल दुकानदाराला धमकी देत खंडणी देण्याची मागणी केली. दीपक शिंदे या आरोपीने दुपारच्या सुमारास मेडिकलमध्ये काम करत असलेल्या अंगत वेताळ या युवकाला चाकूचा धाक दाखवला, तर यापुढे दर महा दहा हजार रुपये खंडणी लागेल अशी मागणी केली. तर खिशातील एक हजार रुपये हिसकावून घेतले. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करत आरोपी दीपक शिंदे याला अटक केली. तर त्याच भागात काही तासांच्या अंतरावर संध्या शिंदे या महिलेचे मंगळसूत्र चोरांनी पळवले. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहा महिन्यात 131 लुटमारीच्या घटना - शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे. मागील सहा महिन्यात 131 लुटमारीच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस होत असलेल्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी काही नियम घालून दिले आहेत. त्यात रात्रीच्या सुमारास होणाऱ्या मारामारीच्या घटना, चोरीचे प्रकार थांबवण्यासाठी रात्री 11 नंतर सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद राहतील, असे आदेश काढण्यात आले. पोलिसांच्या उपाययोजना असल्या तरी या घटना थांबत नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा -

  1. Pune crime: मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना अटक; कोम्बिंग ऑपरेशनचे यश, पोलीस आयुक्त रितेश कुमार
  2. GF Killed BF By Snake : पहिल्या बॉयफ्रेंडला संपवण्यासाठी गर्लफ्रेंडने सापाला घेतले सोबत; 'असा' काढला काटा
  3. doctor killed his father : डॉक्टर मुलानेच केला बापाचा खून, आईने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल
Last Updated : Jul 19, 2023, 10:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details