महाराष्ट्र

maharashtra

पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात ९५ टक्के जलसाठा, ११ दरवाजे उघडले

By

Published : Aug 14, 2020, 8:42 AM IST

या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात ९५ टक्के जलसाठा, ११ दरवाजे उघडले
पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात ९५ टक्के जलसाठा, ११ दरवाजे उघडले

अमरावती - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे ११ दरवाजे ३५ सेंटी मीटरने आज (शुक्रवारी) पहाटे उघडण्यात आले. या धरणातून सध्या ६२० घनमिटर प्रति सेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यावर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने अमरावती शहरास इतर भागातील लोकांचा व शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील व मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहेत. यामुळे अप्पर वर्धा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. परिणामी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी रात्री धरणाचा 1 दरवाजा उघडण्यात आला. मात्र, मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने जलाशयाच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे आज पहाटे धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहे. सध्या धरण 95 टक्के भरले आहे.

मागील वर्षी उन्हाळ्यात धरणाचा जलसाठा हा ११ टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला होता. परंतु, मागील वर्षी झालेल्या दमदार पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा सुद्धा धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने हा प्रकल्प भरला आहे. त्यामुळे आता अमरावती शहर,वरुड,मोर्शी,आष्टीसह आदी गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे. रबी हंगामातील शेतीसाठी सुद्धा या धरणातील पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details