महाराष्ट्र

maharashtra

अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटला, परिसरातील शेतांमध्ये शिरले पाणी

By

Published : Dec 2, 2019, 7:40 PM IST

तिवसा तालुक्यातील जावरा येथे अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. पिकांना पाण्याची गरज नसताना शेतात पाणी साचल्याने  शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

sheti
अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये शिरले पाणी

अमरावती - तिवसा तालुक्यातील जावरा येथे अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले आहे. पिकांना पाण्याची गरज नसताना शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाने नूकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटल्याने परिसरातील शेतांमध्ये शिरले पाणी

हेही वाचा -उजनी धरणाजवळ आढळली सात फूट लांबीची मगर, परिसरात खळबळ

कालवा परिसरातील शेतकरी गुणवंत धर्माळे यांच्या चार एकर शेतात तुरीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, शेतालगतचा कालवा फुटल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरून शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गुणवंत धर्माळे हे अमरावती जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या शेताप्रमाणे इतर शेतांमध्येही पाणी शिरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Intro:अप्पर वर्धा धरणाचा लघु कालवा फुटल्याने शेतात पाणी शिरले

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील शेतकऱ्यांचे नुकसान

अमरावती अँकर
अप्पर वर्धा धरणातुन कालव्याला शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते मात्र अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील जावरा येथे लघु कालवा फुटल्याने शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे

गुणवंत धर्माळे यांच्या चार एकर शेतात तुरीची लागवड करण्यात आली मात्र याच शेता लगत असलेला लघु कालवा फुटल्याने या शेतात पाणी शिरले असून शेताला तलावाचे स्वरूप आले आहे त्यामुळे अप्पर धरणाचे भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे,गुणवंत धर्माळे हे अमरावती जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी आहे
आता कालव्याचे पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे

बाईट-गुणवंत धर्माळे, शेतकरीBody:अमरावतीConclusion:अमरावती

ABOUT THE AUTHOR

...view details