महाराष्ट्र

maharashtra

अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

By

Published : Mar 22, 2021, 7:40 AM IST

गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली असून काढणीला आलेल्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rain
पाऊस

अमरावती -शहरात पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस बरसला. पहाटे पाच वाजता पावसाचा जोर काहीसा वाढला होता. रविवारी दिवसभर कडाक्याचे ऊन पडले होते मात्र, रात्री अचानक पाऊस झाला. पाऊस झाल्याने सोमवारी पहाटे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
शुक्रवारपासून बदलले वातावरण -

अमरावती जिल्ह्यात शुकरवारपासून वातावरणात बदल झाला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होऊन सूर्य तापत असताना शुक्रवारी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसला. मेळघाटात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे चिखलदरा परिसरात दोन दिवस हौशी पर्यटकांची गर्दी वाढली. चिखलदरा तालुक्यासह अचलपूर, तिवसा, धरणी या तालुक्यातही अवकाळी पाऊस जोरदार बरसला. सोमवारी पुन्हा अमरावतीसह चांदुर रेल्वे, तिवसा, दर्यापूर, अचलपूर, चंदूरबाजार या तालुक्यात काळे ढग दाटून आले असून पावसाची शक्यत आहे.

पिकांचे नुकसान

चांदुर बाजार तालुक्यातील विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे संत्र्याला आलेला बहर पूर्णपणे गळून पडला आहे. संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडाला आहे. यासोबतच काढणीला आलेला गहू, हरभरा,कांदा व इतर भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.

या गावांना बसला फटका -

जिल्ह्यात सलग चार दिवसांपासून पाऊस आणि गारपीट होत आहे. मेळघाटातील धारणी, चिखलदरा, बैरागड या परिसरातील शेतीला फटका बसला आहे. अचलपूर तालुक्यात बहिराम, कारंजा, सारफापूर, सायखेड या गावात शेतीचे नुकसान झाले आहे. तिवसा तालुक्यात भारसावडी, शेंदूरजना बाजार, धमंत्री या गावातील शेतीला अवकाळी पावसाची झळ बसली आहे.

हेही वाचा -अमरावती जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट; संत्राचा अंबिया बहाराला फटका

ABOUT THE AUTHOR

...view details